25 C
New York
Tuesday, June 6, 2023

Marriage Hall On Wheels: तुम्ही पाहिलंय का हे चांलतं-फिरतं मंगलकार्यालय? आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक

Marriage Hall On Wheels: लग्न समारंभ हा प्रत्येकासाठी भव्य असा कार्यक्रम असतो. प्रत्येकालाच आपलं लग्न भव्य दिव्य व्हावं असं वाटतं. त्यासाठी अनेक जण मंगलकार्यालय (Mangalkaryalaya Viral Video) बुक करतात. परंतु लग्नासाठी मंगलकार्यालयच (Moving Marriage Hall) तुमच्या घरी आलं तर? प्रश्न ऐकूण विचारात पडला आहात का? पण हे शक्य आहे. प्रसिद्ध बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी अशात ट्विटर एक व्हिडिओ (Marriage Hall On Wheels) पोस्ट केला आहे. यात एक चालतं फिरतं मंगलकार्यालय दिसत आहे आणि हे मंगलकार्यालय (portable marriage hall) सामान्य मगंलकार्यालयापेक्षा कुठेही कमी नाही. आनंद महिंद्रा यांनी (Anand Mahindra) हा व्हिडिओ पोस्ट करताना या पोर्टेबल मॅरेज हॉलच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.Also Read – Earth From Mars: आनंद महिंद्रांनी ट्वीट केला मंगळावरून घेतलेला पृथ्वीचा फोटो, विचार करण्यास भाग पाडेल कॅप्शन

सध्याच्या आधुनिकरणाच्या युगात मोबाईल टॉयलेटपासून ते मोबाईलक्लिनिकपर्यंत अनेक सुविधा लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र आता सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईच्या या काळात एक चालतं फिरतं मंगलकार्यालय पाहायला मिळत आहे. तुम्ही लग्नमंडपापर्यंत पोहचू शकत नसाल तर हे मंगलकार्यालयच तुमच्यापर्यंत येऊ शकते. कसं आहे हे मंगलकार्यालय तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. एका ट्रकचं रुपतांत अतिशय सृजनात्मक पद्धतीने लग्नमंडपात करण्यात आले आहे. आणि त्यात सर्व सुख सुविधा देखील आहेत. Also Read – Agnipath Scheme: अग्निवीरांसाठी नोकरीची आणखी एक संधी, उद्योगपती आनंद महिंद्रांची मोठी घोषणा

येथे पाहा पोर्टेबल मंगलकार्यालयाचा व्हिडिओ

I’d like to meet the person behind the conception and design of this product. So creative. And thoughtful. Not only provides a facility to remote areas but also is eco-friendly since it doesn’t take up permanent space in a population-dense country pic.twitter.com/dyqWaUR810

— anand mahindra (@anandmahindra) September 25, 2022

Also Read – Viral Video: चिमुकल्याचा मासे पकडण्यासाठीचा देसी जुगाड पाहून आनंद महिद्रा झाले आश्चर्यचकित!

आनंद महिंद्रा यांनी या कल्पनेमागील चातुर्याचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “हे म कार्यालय दुर्गम भागात सुविधाच तर प्रदान करूच शकते, शिवाय दाट लोकसंख्या असलेल्या भागात ते कायमस्वरूपी जागाही घेत नाही. त्यामुळे ते पर्यावरणास अनुकूल देखील आहे.”

हा विवाह हॉल 40×30 चौरस फूटांचा आहे आणि त्यात 200 लोक बसू शकतात असा दावा केला जात आहे. स्टायलिश इंटीरियर असलेल्या या चालत्या फिरत्या मंगलकार्यालयाने इंटरनेटवर प्रचंड प्रशंसा मिळवली आहे. हे मंगलकार्यालय अतिशय चांगली कल्पना आहे अशा प्रतिक्रिया यूजर्स व्यक्त करत आहेत.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles