15.7 C
New York
Friday, June 9, 2023

मारुतीची Grand Vitara भारतात लाँच! मिळेल 28चं मायलेज, दमदार फीचर्स आणि बरंच काही

Maruti Grand Vitara price and features : मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या (Maruti Suzuki Grand Vitara ) प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित SUV Grand Vitara अखेर लॉन्च केली आहे. कंपनीने या एसयूव्हीची (Maruti Suzuki Grand Vitara) किमंत आणि फीचर्स देखील जाहीर केले आहेत. ग्रँड विटारा एकूण 10 व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येऊ शकते. यात सिग्मा, डेल्टा, झेटा, झेटा+, अल्फा आणि अल्फा+ या व्हेरिएंटचा समावेश आहे. यापैकी Zeta + आणि Alpha + व्हेरिएटमध्ये इंटेलिजेंट हायब्रिड सेटअप उपलब्ध असेल. जाणून घेऊया मारुतीच्या या बहुप्रतिक्षित SUV Grand Vitara विषयी.Also Read – आकर्षक किमतीसह भारतात लवकरच दाखल होणार Maruti Baleno Cross! लूक पाहून पडाल प्रेमात

मारुती ग्रँड विटाराच्या (2022 Maruti Grand Vitara) डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास ते खूपच आकर्षक आहे. फ्रंट-एंडला वर्टिकल-स्प्लिट हेडलॅम्प आर्किटेक्चर मिळते जे ट्राय-बीम LED DRL सह येते आणि फ्रंट टर्न इंडिकेटर म्हणून काम करते. यात 17-इंच डायमंड-कट रिम्स आहेत. कारच्या मागील बाजूस स्लिम हेडलॅम्प उपलब्ध आहेत. Grand Vitara ची लांबी 4,365 mm, रुंदी 1,795 mm आणि उंची 1,645 mm आहे. तर या कारचे व्हीलबेस 2,600 मिमी आहे. Also Read – Maruti Suzuki Festive Offer : सुवर्णसंधी! मारुतीच्या 'या' कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या अधिक माहिती

मारुती ग्रँड विटाराचे फीचर्स (Maruti Grand Vitara Features)

मारुती ग्रँड विटाराच्या Zeta+ आणि Alpha+ व्हेरिएंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा, अपग्रेडेड साउंड सिस्टम, व्हेंटिलेटर फ्रंट सीट्स, पॅडल लॅम्प्स, लेदर स्टीयरिंग व्हील, ब्लॅक लेदर सीट्स, टायर प्रेशर मॉनिटर, पॅनोरॅमिक सनरूफ, ऑल-ब्लॅक इंटीरियर यांसारखे फिचर्स मिळतात. तसेच या SUV मध्ये गोल्ड अॅक्सेंटसह, वायरलेस चार्जर, हेड्स-अप डिस्प्ले, सिल्व्हर रूफ रेल, डार्क ग्रे फ्रंट, रीअर स्किड प्लेट्स आणि ड्युअल-टोन कलर ऑप्शन आणि 7.0-इंच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते. Also Read – Maruti Suzuki Car Offers : कार खरेदी करण्याची सूवर्णसंधी ! मारुती सुझुकीच्या वाहनांवर मिळतोय मोठा डिस्काउंट

मारुती ग्रँड विटाराचे इंजिन (Maruti Grand Vitara Engine)

स्ट्राँग-हायब्रीड पॉवरट्रेनमध्ये इलेक्ट्रिक मोटरसह 1.5-लिटर इंजिन देण्यात आले आहे, जे 114bhp पॉवर आणि 122Nm पीक टॉर्क जनरेट करते. माइल्ड-हायब्रीड व्हेरिएंटविषयी बोलायचे झाल्यास ते 48V माइल्ड-हायब्रिड टेक्नॉलॉजी आणि 1.5L NA पेट्रोल इंजिनसह येते. हे इंजिन 101 bhp पॉवर आणि 136 Nm टॉर्क जनरेट करते. याची माइल्ड-हायब्रीड मोटर एकतर 5-स्पीड एमटी किंवा 6-स्पीड एटीशी जोडली जाऊ शकते. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास ग्रँड विटारा स्ट्रॉन्ग हायब्रिड मोटरसह 27.97 kmpl चा मायलेज देऊ शकते असा कंपनीचा दावा आहे.

मारुती ग्रँड विटाराची किंमत (Maruti Grand Vitara)

मारुती ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 19.65 लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत. मारुती सुझुकी ग्रँड विटारा स्पर्धा भारतीय बाजारपेठेत Hyundai Creta, Kia Seltos, MG Hector, Mahindra XUV700, Volkswagen Taigun, Skoda Kushaq आणि Jeep Compass सारख्या SUV शी असेल. याशिवाय ही कार 2022 Toyota Urban Cruiser Hyryder शी देखील स्पर्धा करेल.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles