2.9 C
New York
Friday, December 8, 2023

Mouni Roy Birthday : मालिकांपासून ते बॉलिवूडपर्यंत असा आहे मौनी रॉयचा प्रवास, 2007 मध्ये केली अभिनयाला सुरुवात!

Mouni Roy Birthday : टीव्हीवरील लोकप्रिय नागिन ते ‘ब्रह्मास्त्र’ची (brahmastra) खतरनाक खलनायकपर्यंतचा प्रवास करणाऱ्या मौनी रॉयचा (Mouni Roy) या शोमधून पदार्पण करणारी बंगाली सौंदर्यवती मौनी रॉय आज तिचा 37 वा वाढदिवस (Mouni Roy Birthday) साजरा करत आहे. मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 (Mouni Roy age) रोजी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे झाला. आपल्या ब्रम्हास्त्रमधील भूमिकेमुळे मौनी रॉयचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटात ती ‘जुनून’ ही खलनायकाची भूमिका साकारत आहे. आज तिच्या वाढदिवसा निमित्त तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा होता हे पाहूया…Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

बंगाली कुटुंबात झाला जन्म

मौनी रॉयचा जन्म बंगाली कुटुंबात (Mouni Roy Bengali family) झाला. अभिनेत्री होणे हे तिचे स्वप्न होते. मौनी रॉयने तिचे शालेय शिक्षण पश्चिम बंगालमधूनच केले. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मौनी रॉयने पत्रकार व्हावे अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. यासाठी त्यांनी जामिया मिलिया इस्लामियाच्या मास कम्यूनिकेशनमध्ये तिचे अ‍ॅडमिशन घेतले. मात्र मौनी रॉयला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तिने मास कम्युनिकेशनचे शिक्षण मधेच सोडले आणि ती मुंबईला आली. मौनी रॉयने पहिल्यांदा अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांच्या ‘रन’ चित्रपटातील एका गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले होते. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!

2007 मध्ये पहिल्यांदा दिसली मालिकेत

मौनीने तिच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये लोकप्रिय टीव्ही शो ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मधून केली होती. त्यानंतर ती कस्तुरी, देवों के देव महादेव, नागिन, नागिन 2, नागिन 3, टशन-ए-इश्क, जुनून, ऐसी नफरत तो कैसा इश्क, कृष्णा चली लंडन, झलक दिखला जा 9, एक था राजा एक थी रानीमध्ये या मालिकांमध्ये दिसली. मात्र तिला कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ या मालिकेतून सर्वात जास्त प्रसद्धी मिळाली. यासोबतच ‘देवों के देव महादेव’मधील मौनीच्या सतीच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

2011 मध्ये मिळाला पहिला चित्रपट

मौनी रॉयने अनेक मालिकांमध्ये आपला दमदार अभिनय दाखवला. यानंतर तिला चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची देखील संधी मिळाली. 2011 मध्ये ती ‘हीरो हिटलर इन लव्ह’ या पंजाबी चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने 2018 मध्ये अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. मौनी रॉय आत्तापर्यंत ‘रोमियो अकबर वॉल्टर’, ‘मेड इन चायना’ आणि ‘लंडन कॉन्फिडेन्शियल’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली आहे. नुकतीच ती ब्रह्मास्त्र या चित्रपटातही दिसली आहे. या चित्रपटात ती खलनायक ‘जुनून’ची भूमिका साकारताना दिसत आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles