25 C
New York
Tuesday, June 6, 2023

Mount Manaslu Avalanche: नेपाळच्या माऊंट मनास्लूमध्ये भीषण हिमस्खलन, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Mount Manaslu Avalanche: नेपाळमधील माऊंट मनास्लूमध्ये (Mount Manaslu, Nepal) भीषण हिमस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या हिमस्खलनाचा सर्वात मोठा तडाख्या माऊंट मनास्लू बेस कॅम्पला (Massive Avalanche at Mount Manaslu) बसला आहे. या घटनेत 3 गिर्यारोहकांचा मृत्यू झालीची माहिती समोर (Mount Manaslu Base Camp) आली आहे, तर 5 जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हिमस्कलानाचा एक व्हिडिओ (Nepal Avalanche Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.Also Read – Viral Video: तुम्ही म्हशीला डान्स करताना कधी पाहिलंय का?, हा व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकीत!

नेपाळमधील मनास्लू पर्वतावर रविवारी सकाळी हे हिमस्खलन झाले. या हिमस्खलनामुळे एव्हरेस्ट बेस कॅम्पवरील अनेक तंबू उद्ध्वस्त झाले. परिसरात बचाव आणि शोध मोहीम सुरू आहे. त्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.यापूर्वी 26 सप्टेंबर रोजी येथे हिमस्खलन झाले होते, त्यात दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका नेपाळी आणि एका अमेरिकन नागरिकाचा समावेश होता. या अपघातात 12 गिर्यारोहक जखमी देखील झाले आहेत. Also Read – Chandni Chowk Bridge Demolished Video : 600 किलो स्फोटके वापरून पाडला चांदणी चौकचा पूल, पाहा व्हिडिओ!

#WATCH | A fresh avalanche has hit the Manaslu Base Camp today. It has come a week after the last one, which had left two persons dead.#Nepal

(Video source: Tashi Lakpa Sherpa) pic.twitter.com/XLTbDVFq2G

— ANI (@ANI) October 2, 2022

Also Read – Viral Video : बंगळुरु एअरपोर्टवर प्रवाशांनी धरला गरब्यावर ठेका, व्हिडिओ होतोय व्हायरल!

जगातील 8वे सर्वोच्च शिखर आहे मनास्लू

माऊंट मनास्लू हे जगातील आठव्या क्रमांकाचे शिखर आहे आणि ते पाचवे सर्वात धोकादायक शिखर मानले जाते. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासूनची 8,163 मीटर आहे. एव्हरेस्ट चढणाऱ्या लोकांसाठी येथे बेस कॅम्प बनवण्यात आला आहे. नेपाळ सरकारने यावर्षी 58 वेगवेगळ्या गटांती 506 गिर्यारोहकांना येथे गिर्यारोहणाची परवानगी दिली आहे. येथील 297 गिर्यारोहणांमध्ये आतापर्यंत 53 गिर्यारोहकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles