MS Dhoni Social Media Post : भारतीय क्रिकेक संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) रविवारी दुपारी चाहत्यांना मोठी बातमी देण्याची शक्यता आहे. धोनीने केलेल्या एक सोशल मीडिया पोस्टवरनंतर (MS Dhoni Post) चाहत्यांच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे. धोनी चाहत्यांना मेसेज देण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता सोशल मीडियावर लाईव्ह (MS Dhoni Live) येणार आहे. त्यामुळे धोनी आयपीएलमधून निवृत्ती तर घेत नाही ना (MS Dhoni Live On Fcebook) अशी चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. धोनीच्या निवृतीच्या शक्यतेने त्याच्या चाहत्यांची धडधड वाढली आहे.Also Read – Team India: एमएस धोनीवर 'या' क्रिकेटरचे गंभीर आरोप, म्हणाला – 'मला संधी दिली असती तर माझे करियर वेगळ्या उंचीवर असते'
महेंद्रसिंग धोनी हा केवळ भारतीयच नाही तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने टी-20 विश्वचषक आणि वडने विश्वचषक जिंकला आहे. एवढच नाही तर धोनीने भारताला कसोटी टेस्ट चॅम्पियनशिप देखील जिंकून दिली आहे. आयसीसीच्या तिन्ही मानाच्या ट्रॉफी (ICC Trophy) उंचावणारा धोनी एकमेव कर्णधार आहे, ही कामगिरी जागतिक क्रिकेटमध्ये धोनीशिवाय कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत करता आलेली नाही. Also Read – लंडनमध्ये फिरताना दिसला MS Dhoni, माहीला पाहताच फॅन्सची गर्दी; Video होतोय व्हायरल
महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो फक्त आयपीएल स्पर्धा खेळत आहे. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत 4 वेळा चषक जिंकला आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांची संघ्या मोठ्या प्रमाणात आहे. हेच चाहते धोनीची मैदानावर खेळण्यासाठी येण्याची प्रतिक्षा करत असतात. आयपीएलमध्ये त्यांना आपल्या आवडत्या खेळाडूला खेळताना पाहण्याची संधी मिळते. परंतु धोनी उद्या काहीतरी मोठी घोषणा करणार आहे. त्यामुळे तो निवृत्ती तर घेत नाही ना अशी शंका आता त्याच्या चाहत्यांना मनात निर्माण झाली आहे. आता रविवारी 25 सप्टेंबर रोजी धोनी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धोनी सोशल मीडियावरून संवाद साधणार असल्याने तो काहीतरी मोठी बातमी देणार हे मात्र निश्चत मानलं जात आहे. परंतु तो कोणत्या विषयावर बोलणार आहे, हे मात्र अद्याप असप्ष्ट आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये “खास बातमी सर्वांसोबत शेअर करणार असल्याची माहिती. त्यामुळे धोनी काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कमेंट केल्यात जात आहे.