Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी (Mumbaikar) ही बातमी खूपच महत्वाची आहे. आज जर तुम्ही लोकलने प्रवास (local Travel) करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण आज लोकलने प्रवास करणे तुम्हाला त्रासदायक ठरेल. कारण आज रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. उपनगरीय रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य (Central Line Mega Block) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (Harbour Line Mega Block) आज मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे.Also Read – Indonesia Football Match Violence: मृत्यूतांडव! इंडोनेशियात फुटबॉलची मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे समर्थक आमने-सामने, हिंसाचारात 129 जणांचा मृत्यू
असा असेल मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक (Central Line Mega Block) –
अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा धावतील. Also Read – Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!
तर कल्याणहून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. या लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!
असा असेल हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक (Harbour Line Mega Block) –
आज हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरुन सुटणाऱ्या लोकलसेवा बंद राहतील. तर सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी वांद्रे/गोरेगाव डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहिल. दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेनलाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.