14.5 C
New York
Saturday, September 30, 2023

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अडचणीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. छगन भुजबळ आणि अन्य दोघांवर मुंबईत गुन्हा दाखल (FIR Against Chhagan Bhujbal) करण्यात आला आहे. एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी (Threatening to Kill) दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुजबळ आणि अन्य दोघांनी चेंबूर येथील एका व्यक्तीला व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजद्वारे धमक्या दिल्याचे आरोपामध्ये म्हटले आहे.Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

मिळालेल्या माहितीनुसार, जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर चेंबूर येथील एका रहिवाशाने छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. टेकचंदानी या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली असून ते व्यावसायिक आहेत. टेकचंदानी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. Also Read – मुसळधार पावसात Rahul Gandhi यांनी केले भाषण; सर्वांना आली Sharad Pawar यांची आठवण, व्हिडिओ होतोय व्हायरल!

छगन भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात कलम 506, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू धर्माचा अपमान केल्याच्या भाषणाचे दोन व्हिडिओ छगन भुजबळ यांना मोबाईलवरुन पाठवले होते. व्हिडिओ पाटवल्यानंतर लगेचच टेकचंदानी यांना व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजद्वारे धमक्या मिळू लागल्या. ज्यामध्ये त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. Also Read – Dussehra Melava 2022 : खरी शिवसेना कोणाची? दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू झालं पोस्टर वॉर

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles