Mumbai News : मुंबईकरांसाठी (Mumbaikar) महत्वाची आणि कामाची बातमी आहे. 1 ऑक्टोबरपासून मुंबईकरांच्या खिशावर ताण येणार आहे. कारण 1 ऑक्टोबरपासून त्यांचा प्रवास महागणार आहे. मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ (Rikshaw -Taxi Fare) करण्यात आली आहे. या भाडेवाढीला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना 1 ऑक्टोबरपासून टॅक्सीच्या प्रवासासाठी 3 रुपये आणि रिक्षाच्या प्रवासासाठी 2 रुपये जास्त द्यावे (Rikshaw-Taxi Fare Increased) लागणार आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी जास्त पैसे खर्च करावा लागणार आहेत.Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
मुंबईतल्या रिक्षा, टॅक्सी युनियनच्या वतीने नुकताच भाडेवाढीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी युनियनच्या भाडेवाढीची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून मुंबईकरांकडून टॅक्सीसाठी 3 रुपये आणि रिक्षासाठी 2 रुपयांनी अतिरिक्त भाडेवाढ आकारली जाईल. Also Read – Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!
रिक्षाचे 21 रुपयांचं मीटर दोन रुपयांनी वाढल्यामुळे मुंबईकरांना 1 ऑक्टोबरपासून रिक्षा प्रवासासाठी 23 रुपये मोजावे लागणार आहे. तर टॅक्सीचं 25 रुपयांचे मीटर तीन रुपयांनी वाढवल्यामुळे मुंबईकरांना टॅक्सी प्रवासासाठी 28 रुपये मोजावे लागणार आहे. मुंबईतील टॅक्सी युनियनने भाड्यात 10 रुपयांची म्हणजेच 25 रुपयांवरून 35 रुपयांपर्यंत वाढ करण्याची मागणी केली होती. तर ऑटो युनियनने देखील भाडेवाढीचा मागणी केली होती. ऑटो युनियनला भाड्यात किमान 3 रुपये वाढीची अपेक्षा केली होती. अखेर याबद्दलच्या निर्णयाला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानंतर टॅक्सीच्या भाड्यात 3 रुपयांनी आणि रिक्षाच्या भाड्यामध्ये 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Also Read – Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अडचणीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल!