8.9 C
New York
Saturday, December 9, 2023

Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

Mumbai News : मुंबईमध्ये (Mumbai) गरब्यादरम्यान (Garba) एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलुंडमध्ये नवरात्रीनिमित्त (Navratri 2022) गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी गरबा खेळत असताना एका तरुणाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) निधन झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहामध्ये भाजपतर्फे प्रेरणा रासचे आयोजन करण्यात आले होते. या प्रेरणा रासमध्ये गरबा खेळताना ऋषभ लहरी मंगे भानुशाली या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ऋषभ आपल्या कुटुंबियांसोबत या प्रेरणा रासमध्ये सहभागी झाला होता. यावेळी गरबा खेळत असताना अचानक ऋषभच्या छातीमध्ये दुखू लागले. अॅसिडिटी झाल्याचे समजून कुटुंबियांनी त्याला थंड पेय पिण्यास दिले. Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना

पण तरी सुद्धा वेदना कमी न झाल्याने कुटुंबियांनी इतरांच्या मदतीने त्याला तात्काळ मुलुंडमधील आदिती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेले. पण डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. दरम्यान, ऋषभ लहरी मंगे भानुशाली हा डोंबिवलीचा रहिवासी होता. डोंबिवली पश्चिममध्ये तो आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. ऋषभने एमबीएचे शिक्षण घेतले होते. बोरिवलीतील एका खासगी कंपनीत ऋषभ कामाला होता. ऋषभ घरामध्ये एकटा कमवणारा व्यक्ती होता. ऋषभच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. Also Read – Navratri 2022: कधी आहे अष्टमी आणि नवमी, या दिवशी का करतात कन्या पूजन घ्या जाणून!

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles