4.9 C
New York
Friday, December 1, 2023

Nanded News : नांदेडमध्ये ट्रक आणि आयशरचा भीषण अपघात, 5 मजूरांचा जागीच मृत्यू!

Nanded News : नांदेडमध्ये (Nanded) बिहारवरुन कामासाठी आलेल्या मजुरांवर काळाने घाला घातला आहे. ट्रक आणि आयशरची (Truck And Eicher Accident) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर (Nanded-Kinwat National Highway) असलेल्या सोनारीफाटा करंजीजवळ हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या मजुरांना सध्या उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.Also Read – NIA Raids on PFI: पीएफआय विरोधातील कारवाई सुरुच, राज्यातील विविध शहरात छापेमारी; औरंगाबादेतून 13 जण ताब्यात!

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारीफाटा करंजीजवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये मत्यू आणि जखमी झालेले सर्व जण रेल्वेच्या कामासाठी आलेले मजूर आहेत. ते नांदेडच्या हिमायतनगर येथे राहत होते. काम आटपून शनिवारी रात्री ते आपल्या घराकडे निघाले होते त्याचवेळी अपघात झाला. सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने आयशरला जोरदार धडक दिली. Also Read – Nanded News: दाढी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा सलून चालकाने चिरला गळा, मृताच्या नातेवाईकांकडून सलून चालकाची हत्या!

या अपघातामध्ये आयशरमध्ये बसलेल्या पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेल्या मजुरांवर सुरुवातीला शासकीय रुग्णलयात उपचार करण्यात आले पण प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये आयशरचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताचा तपास नांदेड पोलिसांकडून सुरु आहे. Also Read – Nanded News: मामाने मुलगी देण्यास दिला नकार, संतापलेल्या भाच्याने कुऱ्हाडीने वार करत केली मामाची हत्या!

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles