15 C
New York
Tuesday, September 26, 2023

National Cinema Day : फक्त 75 रुपयांत घरबसल्या पाहा ब्रह्मास्त्र चित्रपट आणि बरंच काही…

National Cinema Day: भारतीय सिनेसृष्टीला एक मोठा इतिहास (National Cinema History) आहे. भारतीय चित्रपटांना विदेशात देखील पसंती मिळते. अशात आज म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त चित्रपट प्रेमींसाठी एक खूशखबर आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने (Multiplex Association of India) या दिवशी प्रत्येक चित्रपटाचे तिकीट फक्त 75 रुपये ठेवण्यात आले आहे. प्रेक्षकांना बॉलिवूडपासून (Bollywood Movie) ते हॉलिवूडपर्यंतचे अनेक चित्रपट केवळ 75 रुपयांत बघता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही या दिवशी कोणत्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात…Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

ब्रह्मास्त्र

View this post on Instagram

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणारा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त हा चित्रपट तुम्ही 75 रुपयांत पाहू शकतात. याबाबत चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे माहिती दिली आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट

View this post on Instagram

A post shared by Dulquer Salmaan (@dqsalmaan)

चित्रपटांच्या या यादीत आज म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी दुल्कर सलमान आणि सनी देओल स्टारर ‘चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. थ्रिलर अशा या चित्रपटाची कथा कलात्मक चाचणी घेतलेल्या मारेकरी आणि त्याला शोधणारा पोलिस अधिकारी यांच्याभोवती फिरताना दाखवण्यात आली आहे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

धोखा: द राउंड टेबल

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आर. माधवन आणि अपारशक्ती खुराणा यांची महत्वाची भूमिका असलेला धोखा: द राउंड टेबल हा एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट देखील तुम्ही फक्त 75 रुपयांमध्ये बघू शकता.

सीता रामम

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

या चित्रपटात मृणाल आणि दुल्कर सलमान यांची मुख्य भूमिका आहे. तमिळ, तेलगू आणि मल्याळमनंतर आता हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला असून चित्रपटात सलमानने सैनिकाची भूमिका साकारली आहे, तर मृणाल त्याची गर्लफ्रेंड असून ही एक सुंदर प्रेमकथा आहे.

व्हेअर द क्रॉडॅड्स सिंग

हॉलिवूड चित्रपटाची आवड असलेल्या चाहत्यांना व्हेअर द क्रॉडॅड्स सिंग हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट 23 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये पाहता येणार आहे.

अवतार

View this post on Instagram

A post shared by Avatar (@avatar)

जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार’ हा चित्रपटही 23 सप्टेंबर रोजी पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 2009 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट राष्ट्रीय चित्रपट दिनी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles