5.5 C
New York
Saturday, December 9, 2023

Navratri 2022 2nd Day: आज करा देवी ब्रह्मचारिणीची पूजा, जाणून घ्या मंत्र आणि कथा

Navratri 2022 2nd Day: नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात आणि धार्मिक मान्यातांनुसार साजरा केला जात आहे. आज 27 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा (Shardiya Navratri 2022) दुसरा दिवस आहे. हा दिवस दु्र्गा देवीच्या ब्रह्मचारिणी (Maa Brahmacharini) रूपाला समर्पित असतो. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची (Goddess Brahmacharini) विधीपूर्वक पूजा केली जाते. असे केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद (Navratri 2022 Pujan Vidhi) देते अशी मान्यता आहे. तुम्हालाही देवीचा ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद हवा असेल तर आजच्या दिवशी देवीची मनोभावे पूजा करून मंत्रांचा (Brahmacharini Mata Mantra) जप करावा.Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना

देवी ब्रह्मचारिणीचे मंत्र? (Brahamcharini Mata Mantra)

दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलु|
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ||
वन्दे वांछित लाभायचन्द्रार्घकृतशेखराम्।
जपमालाकमण्डलु धराब्रह्मचारिणी शुभाम्॥
गौरवर्णा स्वाधिष्ठानस्थिता द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम।
धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकार भूषिताम्॥
परम वंदना पल्लवराधरां कांत कपोला पीन।
पयोधराम् कमनीया लावणयं स्मेरमुखी निम्ननाभि नितम्बनीम्॥ Also Read – Navratri 2022: कधी आहे अष्टमी आणि नवमी, या दिवशी का करतात कन्या पूजन घ्या जाणून!

या देवी सर्वभेतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। Also Read – Navratri 2022 Navami: नवरात्रोत्सवाची महानवमी कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त

दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

ब्रह्मचारयितुम शीलम यस्या सा ब्रह्मचारिणी.
सच्चीदानन्द सुशीला च विश्वरूपा नमोस्तुते..

ऊँ ब्रां ब्रीं ब्रूं ब्रह्मचारिण्यै नम:

देवी ब्रह्मचारिणी कथा

पौराणिक मान्यतेनुसार हिमालय पर्वतराजाच्या घरी ब्रह्मचारिणी मातेने कन्या म्हणून जन्म घेतला होता. माता ब्रह्मचारिणीला पतीच्या रुपात भगवान शंकर इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी देवर्षी नारदमुनी यांच्या सांगण्यावरून देवीने कठोर तपश्चर्या केली. या कठोर तपश्चर्येमुळेच देवीचे नाव ब्रह्मचारिणी पडले. देवीने 1000 वर्षे फळे आणि फुले खाऊन तपश्चर्या केली. तसेच 100 वर्षे जमिनीवर राहून तपश्चर्या केली. धार्मिक मान्यतांनुसार देवीने निर्जल आणि निराहार राहून अनेक हजार वर्षे तपश्चर्या केली, ती पाहून प्रभू प्रसन्न झाले आणि देवीला मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान मिळाले.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles