15 C
New York
Tuesday, September 26, 2023

Navratri 2022 4th Day: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा देवी कुष्मांडाची पूजा, या मंत्रांचा करा जप

Navratri 2022 4th Day: देशभरात नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. आज (29 सप्टेंबर) नवरात्रीचा चौथा दिवस (Fourth Day of Navratri) आहे आणि हा दिवस दुर्गा देवीच्या कुष्मांडा रूपाला समर्पित असतो. या दिवशी माता कुष्मांडाची विधीपूर्वक पूजा (Mata Kushmanda worship) केली जाते. आठ भुजा असलेली माता कुष्मांडा भक्तांची सर्व संकटे दूर करते अशी मान्यता आहे. तुम्हालाही कुष्मांडा देवीचा आशीर्वाद हवा असेल तर आजच्या दिवशी देवीची विधीवत पूजा (Maa Kushmanda Puja Vidhi) करा आणि खाली दिलेल्या मंत्रांचा जप करा. असे केल्या देवीचा आशिर्वाद प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे.Also Read – Navratri 2022: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अशी करा माता कुष्मांडाची पूजा, जाणून घ्या मंत्र आणि आरती

कुष्मांडा देवी पूजा विधी

नवरात्रीत चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. कुष्मांडा मातेला पांढरा रंग खूप प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी सकाळी स्नान आणि प्रताविधी आटोपून पांढरे कपडे परिधान करावे आणि हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प करावा. यानंतर मंदिरात स्थापित कलशाची आणि दुर्गा मातेच्या मूर्तीची पूजा करावी. पूजेनंतर देवी कुष्मांडाची व्रत कथा वाचावी, मंत्राचा जप करावा आणि देवीची आरती करावी.

कूष्‍मांडा देवीचा मंत्र

या देवी सर्वभू‍तेषु मां कूष्‍मांडा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

वन्दे वांछित कामर्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढ़ा अष्टभुजा कूष्माण्डा यशस्वनीम्॥
भास्वर भानु निभां अनाहत स्थितां चतुर्थ दुर्गा त्रिनेत्राम्।
कमण्डलु, चाप, बाण, पदमसुधाकलश, चक्र, गदा, जपवटीधराम्॥
पटाम्बर परिधानां कमनीयां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्।
मंजीर, हार, केयूर, किंकिणि रत्नकुण्डल, मण्डिताम्॥
प्रफुल्ल वदनांचारू चिबुकां कांत कपोलां तुंग कुचाम्।

कुष्मांडा देवीची व्रताची कथा

धार्मिक मान्यतांनुसार कुष्मांडा माता हे दुर्गा देवीचे चौथे रूप आहे. या अवतारात देवीला आठ हात आहेत आणि त्या हातांमध्ये कमंडल, धनुष्य, बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळपुष्प आणि सिद्धी आणि निधी देणारी जपमाळ आहे. जेव्हा विश्व अस्तित्वात नव्हते तेव्हा मातेने विश्व निर्माण केले आणि विश्वाचे मूळ रूप आणि शक्ती बनली अशी पौराणिक मान्यता आहे. देवी कुष्मांडा एकमेव देवी आहे जी सूर्यमंडलाच्या आतील लोकात निवास करते. देवी कुष्मांडाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि पापं दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे.

(टीप: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. India.Com याचे समर्थन करत नाही. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles