Navratri 2022: नवरात्रोत्सवाचा (Navratri 2022) आनंद सगळीकडे पाहायला मिळत आहे. मोठ्या उत्साहात आणि आनंदात नवरात्रोत्सव (Navratrostav 2022) साजरा केला जात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीत अष्टमी (Astami) आणि नवमीला (Navami) खूपच महत्व आहे. या अष्टमीला दुर्गा अष्टमी (Durgastami) किंवा महाअष्टमी (Mahastami) असेही म्हणतात. नवमीच्या दिवशी नवरात्री संपते.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन
नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला खूप महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजा करणे शुभ मानले जाते. अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन आणि कन्या भोजन ठेवले जाते. आज आपण अष्टमी आणि नवमी तिथी, पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घेणार आहोत. त्याचसोबत कन्या पूजेचे महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत… Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
अष्टमी – 3 ऑक्टोबर 2002
– अष्टमी तिथी सुरु – 2 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 6 वाजून 47 मनिटांनी. Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना
– अष्टमी तिथी संपेल – 3 ऑक्टोबर 2022 दुपारी 4 वाजून 37 मिनिटांनी.
– उदय तिथीमुळे अष्टमीचा उपवास 3 ऑक्टोबरलाच ठेवला जाणार आहे.
नवमी – 4 ऑक्टोबर 2022
– नवमी तिथी सुरू – 3 ऑक्टोबर 2022 दुपारी 4 ववाजून 37 मिनिटांनी.
– नवमी तिथी संपेल – 4 ऑक्टोबर 2022 दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी.
– उडीया तिथीमुळे नवमीची पूजा 4 ऑक्टोबरलाच होईल.
कन्या भोजनाचे महत्त्व –
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला कुमारिकेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. जे नवरात्रीमध्ये उपवास ठेवतात ते कन्या भोजनंतरच उपवास सोडतात. कुमारिकांना देवी मातेचे रूप मानले जाते. या दिवशी कुमारिकांना अन्नदान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे म्हटले जाते. कन्याभोजनाला नऊ कुमारिका असणे गरजेचे असते. दरम्यान, जर मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते, असे देखील सांगितले जाते.