Navratri Colours 2022 : अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2022) सुरुवात होते. शारदीय नवरात्र हा एक हिंदू धर्मातील सण आहे. 9 दिवसांपर्यंत चालणाऱ्या नवरात्रोत्सवाला येत्या 26 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या (Durga Mata) प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रुपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवीशी संबंधित पूजा, नवरात्रीचे नऊ रंग, आराधना आणि व्रत केले जातात. त्या 9 रगांचे या नऊ दिवसांमध्ये विशेष महत्त्व आहे (Navratri 9 colours and their significance) . आज आपण कोणत्या दिवशी कोणता रंग आणि रंगाचे महत्व जाणून घेणार आहोत…Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन
पहिला दिवस – पांढरा रंग (White) –
पहिला दिवस म्हणजेच 26 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी पांढरा रंग शुभ मानला जातो. देवी शैलपुत्रीला हा रंग खूप आवडतो. पांढरा रंग हा श्वेत, शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे. पांढरा रंगामुळे आत्मविश्वावसही वाढतो. Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
दुसरा दिवस – लाल रंग (Red) –
दुसरा दिवस म्हणजेच 27 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंग शुभ मानला जातो. लाल रंग हा साहस, पराक्रम आणि प्रेमाचं प्रतिक आहे. Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना
तिसरा दिवस – नारंगी रंग (Orange) –
तिसरा दिवस म्हणजेच 28 सप्टेंबर 2022 रोजी बुधवारी चन्द्रघंटा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी नांरगी रंग शुभ मानला जातो. या दिवशी नारंगी वस्त्राला महत्त्व आहे. चन्द्रघंटा देवीला नारंगी रंग आवडतो. नांरगी रंगाला सकारात्मक उर्जेचे प्रतिक मानला जाते.
चौथा दिवस – पिवळा रंग (Yellow) –
चौथा दिवस म्हणजेच 29 सप्टेंबर 2022 रोजी गुरुवारी कुष्मांडी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. कुष्मांडी देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळ्या रंगाला सौभाग्याचे, संपत्तीचे आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते.
पाचवा दिवस – हिरवा रंग (Green) –
पाचवा दिवस म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 रोजी शुक्रवारी स्कंदमातेची पूजा केली जाईल. या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो. स्कंदमातेला हिरवा रंग आवडतो. हिरवा रंग निसर्गाचे प्रतिक आहे.
सहावा दिवस – राखाडी रंग (Grey) –
सहावा दिवस म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी कात्यायनी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी राखाडी रंग शुभ मानला जातो. कात्यायनी देवीला राखाडी रंग आवडतो. त्यामुळे या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. राखाडी रंगाला बुद्धिमत्तेचे प्रतिक मानले जाते.
सातवा दिवस – निळा रंग (Blue) –
सातवा दिवस म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 रोजी रविवारी म्हणजेच सप्तमीला कालरात्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी निळा रंग शुभ मानला जातो. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळ्या रंगाला विश्वासाचे प्रतिक मानले जाते.
आठवा दिवस – जांभळा रंग (Purple/Violet) –
आठवा दिवस म्हणजेच 3 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी म्हणजेच अष्टमीला महागौरी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी जांभळा रंग शुभ मानला जातो. महागौरी देवीला जांभळा रंग आवडतो. जांभळा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचे प्रतिक मानले जाते.
नववा दिवस – गुलाबी रंग (Pink) –
नववा दिवस म्हणजेच 4 ऑक्टोबर 2022 रोजी मंगळवारी म्हणजेच नवमीला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल. या दिवशी गुलाबी रंग शुभ मानला जातो. सिद्धिदात्री देवीला गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचे आणि स्त्री शक्तीचे प्रतिक आहे.