21.2 C
New York
Friday, September 22, 2023

Navratri Festival 2022: नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांना दाखवा ‘ हे ‘ वेगवेगळे नैवेद्य, पूर्ण होतील सर्व मनोकामना

Navratri Festival 2022: हिंदू धर्मात नवरात्रीला (Navratri 2022) विशेष महत्त्व आहे. यावर्षी नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबरपासून (navratri 2022 date) होईल. या उत्सवात माता दुर्गेच्या विविध 9 रूपांची पूजा केली जाते. देशभरात नवरात्रीचा सण (Navratri Festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस माता दुर्गेची उपासना करतात. या उत्सवात माता दुर्गेच्या 9 रुपांना वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. मान्यतेनुसार असे केल्याने माता दुर्गा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन

माता शैलपुत्री

नवरात्रीचा पहिला दिवस माता शैलपुत्रीला समर्पित आहे. या दिवशी माता दुर्गेच्या या रूपाची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला गायीच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते. असे केल्याने रोग आणि प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

ब्रह्मचारिणी माता

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते, या दिवशी मातेला गुळ साखर आणि पंचामृत अर्पण करावे. असे केल्याने ब्रह्मचारिणी माता दीर्घायुष्याचे वरदान देत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना

चंद्रघंटा देवी

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला दूध किंवा माव्याची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करावी. असे केल्याने धन आणि वैभवाचे वरदान मिळते.

कुष्मांडा माता

चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. या दिवशी मातेला मालपुआ अर्पण केला जातो. मालपुआचा प्रसाद घरातील सदस्यांनाही खाऊ घालावा. असे केल्याने बौद्धिक क्षमता वाढते.

स्कंदमाता

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केळीची खीरही बनवून अर्पण करू शकता. असे केल्याने करिअरशी संबंधित वरदान प्राप्त होतो.

माता कात्यायनी

नवरात्रीचा सहावा दिवस माता कात्यायनीला समर्पित आहे. या दिवशी देवीला गोड पान नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. मान्यतेनुसार असे केल्याने सौंदर्य वाढते आणि दीर्घायुष्य देखील लाभते.

माता कालरात्री

नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री मातेला समर्पित आहे. या दिवसाची पूजा कालरात्री पूजा म्हणून केली जाते. या दिवशी गूळ किंवा गुळापासून बनवलेल्या वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात. असे केल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते.

महागौरी

नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला नारळ अर्पण केले जाते. असे केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

सिद्धिदात्री माता

नवरात्रीचा शेवटचा दिवस माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे. मातेच्या पूजेच्या दिवशी हरभरा आणि हलवा अर्पण केला जातो. या दिवशी कन्याला भोजन देण्याची परंपरा आहे.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles