4.9 C
New York
Friday, December 1, 2023

Navratri 2022 : पुढचे ९ दिवस चुकूनही करू नका ही कामे ! दुर्गामातेची नाराजी पडेल भारी…

Navratri Rule 2022 : नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) 26 सप्टेंबर म्हणजे आजपासून सुरुवात झाली. पुढचे नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. 9 दिवसामध्ये सर्वजण आई दुर्गेच्या (Mata Durga) भक्तीच्या रंगात रंगून जातात. नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमही (Navratri Rules) सांगण्यात आले आहेत. आई दुर्गेची या नऊ दिवसांमध्ये भक्ती भावाने पूजा केली जाते. आईला प्रसन्न करण्यासाठी भक्तिभावाने उपासना केली जाते, उपवास ठेवला जातो. पण या नऊ दिवसांमध्ये तुम्ही काही चूका करणे टाळा नाही तर आई दुर्गा नाराज झाली तर तुमच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात. या चूका कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन

नवरात्रीत करु नका या चुका –

-माँ दुर्गेच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व दु:ख दूर होतात आणि अपार सुख आणि समृद्धी मिळते. जर तुम्हालाही नवरात्रीमध्ये माँ दुर्गेची विशेष कृपा मिळवायची असेल तर खाली दिलेली कामं तुम्ही चुकूनही करू नका. ही कामं कोणती आहेत हे घ्या जाणून… Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

– जर तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करत असाल आणि घटस्थापना करून अखंड ज्योत प्रज्वलित करत असाल तर घर रिकामे ठेवू नका. घरात कोणीतरी असणे गरजेचे आहे. Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना

– नवरात्रीमध्ये घटस्थापना करणे म्हणजे आई दुर्गाला तिच्या घरी येण्याचे आमंत्रण देणे. अशा स्थितीत पूजा आणि आरती सकाळी आणि संध्याकाळी केलीच पाहिजे. तसेच सात्विक भोजन करावे असे जर तुम्ही केले नाही तर आई दुर्गा नाराज होऊ शकते.

– घटस्थापना करत असलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. कोणताही उग्र वास घेऊ नका. या काळात लसूण-कांद्याचे पदार्थ घरात शिजवू नका किंवा घरात आणू नका. अन्यथा ही चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते.

– नवरात्रीच्या नऊ दिवसांत केस, नखे कापू नका. दाढी करू नका. पूजेच्या वेळी चामड्याची कोणतीही वस्तू घालू नका. काळ्या रंगाचे कपडे आणि लेदर शूज, पर्स, बेल्ट यापासून नऊ दिवस दूर राहणे चांगले.

– नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत उत्साहात संवेदना गमावू नका आणि चुकूनही कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका.

– नवरात्रीच्या काळात कोणाला वाईट बोलू नका आणि मनात नकारात्मक विचार आणू नका. कोणत्याही महिलेचा किंवा मुलीचा अपमान करू नका. या चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles