15.9 C
New York
Friday, September 22, 2023

Navratri Fast 2022 : नवरात्रीमध्ये उपवासासाठी हे पदार्थ जरुर खा, आरोग्य राहिल चांगले!

Navratri Fast 2022 : नवरात्रोत्सव (Navratrotsav 2022) जवळ आला आहे. 26 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. अश्विन महिन्याच्या (Ashwin Month) शुक्ल प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2022) सुरुवात होते. यावर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतल्यामुळे नवरात्रीसाठी सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन

नवरात्रीमध्ये बरेच जण उपवास ठेवतात. काही जण तर नवरात्रोत्सवात नऊ दिवस काही न खाता फक्त पाणी (Water) आणि जूस (Juice) पितात. तर अनेक जण फळं (Fruits) खातात किंवा फळ आणि पाण्यावरच (Fruits and Water) राहतात. पण कधी कधी फळ, दूध किंवा पाणी (Water, Milk and Fruits) यांचा समतोल नसल्यामुळे या लोकांना त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तुम्हाला अशा उपवासाच्या (fast) पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने तुम्हाच्या शरीराला पोषक तत्वे देखील मिळतील आणि तुमचा नवरात्रोत्सवाचा उपवास देखील तुटणार नाही. Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

केळी-अक्रोड शेक (Banana-walnut shake) –

नवरात्रोत्सवाच्या उपवासादरम्यान केळी आणि अक्रोडचा शेक हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. यासाठी केळी, ताक, अक्रोड आणि मध घ्या. हे सर्व पदार्थ मिक्सरमधून एकत्र करुन घ्या. यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे असे चवीनुसार मध घालू शकता. हा शेक प्यायल्यामुळे तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. Also Read – Navratri 2022: नवरात्रीच्या उपवासात फळं आणि फराळासह खा सेंधा मीठ? जाणून घ्या फायदे Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना

नारळ आणि मध (Coconut and honey) –

यासाठी तुम्हाला पीनटर बटर, मध, नारळाचे पीठ आणि नारळाचा चव (Peanut butter, honey, coconut flour) घ्यावा लागेल. सर्वात आधी मध आणि पीनटर बटर चांगले मिक्स करुन घ्या. यानंतर यामध्ये नारळचे पीठ मिक्स करुन एकजीव मिश्रण तयार करुन घ्या. आता याचे गोळे तयार करुन घ्या. या गोळ्यांना नारळाचा चव लावा. आता काही काळ हे गोळे फ्रीजमध्ये असेच ठेवा. काही वेळानंतर हे गोळे फ्रीजमधून काढून तुम्ही खाऊ शकता. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. जे शरीराला खूप फायदेशीर असतात. Also Read – Garlic Honey Health Benefits: रोज उपाशी पोटी करावे कच्चे लसूण आणि मधाचे सेवन, मिळतील मोठे फायदे!

ओट्स खीर (Oats Kheer) –

उपवासादरम्यान तुम्ही ओट्स खीर खाऊ शकता. हे बऱ्यापैकी निरोगी असते. यासाठी पॅन गरम करुन घ्या त्यावर तूप (Ghee ) टाका. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये ओट्स टाकून थोडा वेळ ओट्स भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये दूध घाला. ओट्स मऊ होईपर्यंत ते व्यवस्थित हलवत राहा. त्यानंतर यामध्ये ड्राय फ्रूट्स (Dry fruits) घाला आणि ते एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. तुम्ही ही ओट्स खीर गरम किंवा थंड करुन खाऊ शकता. ओट्स खीर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles