5.5 C
New York
Saturday, December 9, 2023

Nawazuddin Siddiqui Daughter: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लाडक्या लेकीचा फोटो होतोय व्हायरल, हुबेहूब वडिलांची कॉपी!

Nawazuddin Siddiqui Daughter: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि सीरीजमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या दमदार अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनावर वेगळा ठसा उमटवला आहे. अनेकदा नवाज आपल्या पर्सनल प्रॉब्लम्समुळे देखील लाइमलाइटमध्ये असतो. आता तो आपल्या लाडक्या लेकीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डॉटर्स डेला (daughter’s day) त्याने आपल्या लेकीसाठी केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या मुलीचा फोटो त्याने शेअर केला होता.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

काय आहे नवाजुद्दीनची पोस्ट

आपल्या कुटुंबाला नवाज नेहमीच लाइमलाइटपासून दूर ठेवतो. 25 सप्टेंबर रोजी डॉटर्स डेच्या निमित्ताने नवाजुद्दीन सिद्दिकीने आपल्या लेकीचा फोटो शेअर केला होता. त्याने तिला जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच्या लेकीचे नाव शोरा आहे. जी खूप क्यूट आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये शोरा स्माइल करताना दिसतेय. या फोटोला नवाजने कॅप्शन देत लिहिले की, ‘तुझ्या स्माइलपेक्षा जास्त मौल्यवान काहीच नाही. डॉटर्स-डेच्या तुला खूप शुभेच्छा’ Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!

चाहते करत आहेत कमेंट्स

फोटोमध्ये शोरा स्माइल करताना दिसत आहे. हा फोटो एका फोटोतून क्रॉप्ड केलेला दिसतोय. मात्र तरीही चाहत्यांना हा फोटो पसंत पडत आहे. यावर लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातोय. चाहते यावर हार्ट कमेंट करत आहेत. तसेच ती नवाजुद्दीनची कॉपी असल्याचे देखील चाहते म्हणत आहेत. एकाने यावर लिहिले की, ‘ही तर नवाजभाई सारखी दिसतेय.’ एका चाहत्याने कमेंट करुन लिहिले की, ‘चेहऱ्याचे एक्सप्रेशन नवाजभाई सारखेच आहेत.’ अनेक चाहते या फोटोवर क्यूट, सो ब्यूटीफूल अशा कमेंट्स करत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने 2009 मध्ये आलियासोबत लग्न केले होते. 2011 मध्ये यांना शोरा झाली. या दोघांना एक मुलगा देखील आहे. ज्याचे नाव यानी आहे. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

View this post on Instagram

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)

हे चित्रपट होणार आहेत रिलीज

नवाजुद्दीनकडे अनेक चित्रपट आहेत. नुकतेच त्याचे हड्डी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टमध्ये तो महिलेच्या गेटअपमध्ये दिसतोय. नवाजुद्दीनचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. यासोबतच त्याच्याकडे सध्या द माया टेप हा चित्रपट आहे. तो ऑक्टोबर 2022 मध्ये रिलीज होणार आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles