Neha Kakkar : बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar)आपल्या गाण्यामुळे नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. काहींना तिचे गाणे आवडते तर काही जण तिला ट्रोल करत असतात. आता देखील तसेच झाले आहे. नुकतेच तिचे ‘ओ सजना’ हे गाणे रिलीज झाले. फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या ‘मैने पायल है छनकाई’(Maine Payal Hai Chankai) या सुपरहिट गाण्याचे हे रिक्रिएशन आहे. मात्र हे गाणे नेटकऱ्यांना आवडलेले नाही. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. फाल्गुनी पाठक यांनी देखील सोशल मीडियावर याविषयी स्टोरी पोस्ट केली आहे. चाहते नेहाला ट्रोल करत असल्याची स्टोरी फाल्गुनी यांच्याकडून शेअर करण्यात येत आहेत. 90 च्या दशकातील प्रसिद्ध असलेले हे गाणे चाहत्यांनी त्या काळात डोक्यावर घेतले होते.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!
‘हे पाप बंद करा…’
नेहा कक्करच्या या गाण्यावर चाहते टीका करत आहेत. एका यूजरने लिहिले की, फाल्गुनी पाठक यांनी नेहाच्या विरोधात केस करायला हवी. तर एकाने डोक्याचा वापर करुन काही तरी चांगले गाणे तयार करण्याची मागणी केली आहे. तर एका यूजरने लिहिले की, माफ करा पण हे गाणे गाऊन तु आमच्या बालपणीच्या आठवणींसोबत छेडछाड केली आहे. तर एकाने लिहिले की, जे गाणे पहिल्यापासूनच सुपरहिट आहे. नेहा त्या गाण्याचा वापर करुन पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहे. तर एकाने ‘हे पाप बंद करा, प्लीज कोणी तरी ऑटो ट्यून सिंगर आणि रिमेक बंद करा’ असे लिहिले आहे. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!
फाल्गुनी पाठकचाही चाहत्यांना पाठिंबा
फाल्गुनी पाठकच्या गाण्यांचे अनेक चाहते आहेत. आता त्यांचे गाणे अशा प्रकारे रिक्रिएट केल्याने त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. ते सोशल मीडियावर नेहाला ट्रोल करत आहे. असे असतानाच फाल्गुनी यांनी देखील चाहत्यांचे मीम्स आपल्या सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी नेहाला ट्रोल करणाऱ्या अनेक स्टोरी आपल्या इंस्टाग्रामवर रिपोस्ट केल्या आहेत. त्यांनी चाहत्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. यावरुन त्यांना देखील नेहाचे गाणे आवडलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. Also Read – Solapur News: हृदयद्रावक! पत्नीची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी, पहिल्या पत्नीनेही तिथेच दोन मुलांसह दिला होता जीव
लव्ह रोमँटिक आहे गाणे
नेहा कक्करने रिलीज केलेल्या गाण्याचे नाव ‘ओ सजना’ असे आहे. या गाण्याला तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे. तर नेहाने हे गाणे गायले आहे. या गाण्यात रोमँटिक लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. तसेच गाण्यात प्रियांक शर्मा नेहा क्कर आणि धनश्री वर्मा (Dhanshree varma) यांचा डान्स आहे. या गाण्यात एक सुंदर लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे.