Nora Fatehi Lavani : डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhla Jaa 10) या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे. नोरा फतेहीने आपल्या डान्सने खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या किलर डान्स स्टेप्सने ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते. आता तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘झलक दिखला जा 10’ च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नोरा फतेहीचा डान्स (Nora Fatehi Lavani) पाहून माधुरी दीक्षितही (madhuri dixit) स्वतःला शिट्टी वाजवण्यापासून रोखू शकली नाही. एवढेच नाही तर मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत (Amruta khanvilkar) तिने ठेका धरला आहे.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!
माधुरीच्या विनंतीनंतर नोराची लावणी
कलर्स टीव्हीच्या पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नोरा फतेही हिरव्या रंगाची नऊवारी साडी, नाकात सोनेरी नथ आणि हेवी वर्क ज्वेलरीमध्ये मराठी लूकमध्ये दिसतेय. अभिनेत्री अमृता खानविलकर यावेळी लावणी डान्स नंबर सादर करून शोमध्ये परफॉर्म करणार आहे. माधुरीला लावणी आवडते. अमृताचा परफॉर्मन्स संपल्यावर, माधुरीने नोरा फतेहीला स्टेजवर अमृतासह लावणी नृत्य करण्याची विनंती केली. नेहमीप्रमाणे यावेळेसही नोरा लावणी करुन सर्वांची मने जिंकून घेत आहे. ‘वाजले की बारा…’ या गाण्यावर नोराने लावणी सादर केली आहे. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!
माधुरीनेही वाजवली शिट्टी
या व्हिडिओमध्ये अमृतासह नोरा फतेही जबरदस्त लावणी सादर करत आहेत. यामध्ये नोराचे एक्सप्रेशन्स लक्ष वेधून घेत आहेत. या दोघींचा डान्स माधुरी पूर्णपणे एन्जॉय करताना दिसतेय. नोरा फतेहीचा डान्स संपताच माधुरी दीक्षित जोरात शिट्टी वाजवते. तसेच आनंदात स्टँडिंग ओवेशनही देताना दिसतेय. वेस्टर्न डान्स करणाऱ्या नोराने लावणी देखील मस्त केली आहे. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!
पाहा नोराची धमाकेदार लावणी
View this post on Instagram
माधुरी दीक्षित आणि नोरा फतेहीसोबत करण जोहर ‘झलक दिखला जा 10’ला जज करत आहे. व्हिडिओ शेअर करताना मेकर्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नऊवारीमध्ये सजलेल्या नोराने अमृतासोबत अप्रतिम लावणी परफॉर्मन्स दिला. या वीकेंडची जुगलबंदी पाहायला विसरु नका.’ या व्हिडीओला चाहतेही खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत. नोरा फतेहीच्या या लावणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.