Nupur Shikhare Nude Photo: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira Khan) सध्या तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहे. इरा खानने नुकताच एका कार्यक्रमात बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) साखरपुडा केला. या सारखपुड्यानंतर आता सर्वांना आमिर खानच्या होणाऱ्या जावईबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच तो एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर नुपूर शिखरेची तुलना रणवीर सिंगसोबत केली जात आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
तीन वर्षे जुने फोटोशूट
View this post on Instagram
फिटनेस ट्रेनर असणारा नुपूर शिखरे हा इरा खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे अधिकच चर्चेत आला आहे. अशातच दोघांचा साखरपुडा देखील झाला. त्यामुळे नेटिझन्स नुपूर शिखरेविषयी अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना नेटिझन्सच्या हाती आता नुपूरचे न्यूड फोटो लागले आहे. मात्र हे फोटोशूट लेटेस्ट नसून तीन वर्षांपूर्वी केलेले आहे. त्यावेळी या फोटोशूटची फारशी चर्चा झाली नव्हती. मात्र आता त्याचे नाव इरा सोबत जोडले गेल्यानंतर हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2019 चे हे फोटोशूट असून नुपूरने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंवर पोस्ट केले होते. यात नूपुर धावताना दिसत आहे. सोबत त्याने एक कॅप्शन देखील दिले असून यात त्याने म्हटले आहे की, ‘धावणे ही एक शिस्त आहे, जी मी स्वतःला लावली आहे. ही सवय खूप काही शिकवते. जर तुम्ही रोज धावत असाल, तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळू शकते.’ Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
कोण आहे नूपुर शिखरे?
2022 पासून इरा खानाला डेट करत असलेल्या नुपूर शिखरे यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. एसडी कटारिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नुपूरने आर.ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नुपूर एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. मात्र सध्या तो इरासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल