14.5 C
New York
Saturday, September 30, 2023

वेदांता-फॉक्सकॉननंतर आता PhonePe महाराष्ट्राबाहेर जाणार, मुख्य कार्यालय कर्नाटकात हलवण्याचा निर्णय!

PhonePe Office : महाराष्ट्रामध्ये सुरु करण्यात येणारा आणि लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातमध्ये (Gujarat) हलवण्यात आला. यावरुन सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत आहेत. अशामध्ये आणखी एक कंपनी महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या तयारीमध्ये आहे. डिजिटल पेमेंटसाठी (digital payments) प्रसिद्ध असलेल्या फोन-पे (PhonePe) कंपनीने मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

फोन-पे कंपनीने आपले मुंबईतील कार्यालय महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य कर्नाटकात हलवण्याचे ठरवले आहे. याबाबतच्या निर्णयाची माहिती कंपनीने वृत्तपत्रात जाहिरातीद्वारे दिली आहे. कंपनीने दिलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये आपले मुंबईतील ऑफिस कर्नाटकमध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे. फोन पे कंपनीच्या या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होऊन राजकारण तापण्याची शक्यता आहे. Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

महाराष्ट्र आणि मुंबईतील कॉर्पोरेट कंपन्या आणि प्रकल्प हे दुसऱ्या राज्यांमध्ये पळवापळवी सुरु आहे. यावरुन आता संताप व्यक्त केला जात आहे. फोन-पे या कंपनीचे मुंबईतल्या अंधेरी येथे असणारे मुख्य कार्यालय महाराष्ट्राबाहेर हलवण्यासंदर्भात एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्येच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने याला मंजुरी दिल्यानंतर फोन-पेचे ऑफिस महाराष्ट्राबाहेर म्हणजेच कर्नाटकात जाईल. Also Read – मुसळधार पावसात Rahul Gandhi यांनी केले भाषण; सर्वांना आली Sharad Pawar यांची आठवण, व्हिडिओ होतोय व्हायरल!

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles