21.2 C
New York
Friday, September 22, 2023

PM Modi Japan Visit: शिंजो आबे यांच्यावर आज राजकीय अंत्यसंस्कार, जपानला पोहोचले पंतप्रधान मोदी!

PM Modi Japan Visit: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज टोकियोला पोहोचले आहेत. येथून पंतप्रधान आकासाका पॅलेसमध्ये जातील, तेथे त्यांना अभिवादन करण्यात येईल. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, या भेटीदरम्यान पंतप्रधान बुडोकन येथील शासकीय अंत्यसंस्कार समारोहात उपस्थित राहतील. पीएम मोदींचा जपान दौरा एकूण 12 ते 16 तासांचा आहे. येथे पंतप्रधान मोदी अंत्यसंस्कारात उपस्थित राहतील आणि त्यानंतर ते शिंजो आबे यांच्या पत्नी आणि पंतप्रधान फुमियो किशिदा यांना संवेदना व्यक्त करतील.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी होतील सामिल

शिंजो आबे यांच्या राजकीय अंतिम संस्कारामध्ये 20 पेक्षा जास्त राष्ट्राध्यक्षांसह 100 पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. भारताने आबे यांच्या सन्मानार्थ 9 जुलै 2022 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. शिंजो आबे यांना भारत आणि जपान यांचे संबंध मजबूत करणाऱ्या जपानी पंतप्रधान म्हणून लक्षात ठेवले जाईल. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!

गोळ्या झाडून करण्यात आली होती हत्या

शिंजो आबे यांचे 8 जुलै 2022 रोजी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर 15 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज शिंजो आबे यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका सभेमध्ये गोळी झाडण्यात आली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की, शिंजो आबे यांच्यावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर हा हल्ला नारा शहरात झाला. ते जपानमध्ये होणाऱ्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी प्रचार करत होते. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान(Youngest Prime Minister Of Japan)

2006 मध्ये आबे पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. यासोबतच जपानच्या सर्वात तरुण पंतप्रधानाचा किताब त्यांच्या नावावर जमा झाला. त्यांचा पहिला कार्यकाळ फार काळ टिकला नाही. आबे यांना पुढच्याच वर्षी म्हणजे 2007 मध्ये राजीनामा द्यावा लागला. यानंतर, 2009 मध्ये त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला. 2012 मध्ये ते पुन्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्ष विजयी झाला. निवडणुकीदरम्यान, त्यांनी जपानच्या लोकांना अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे, चलनवाढीला आळा घालणे, दुसऱ्या विश्वयुद्धानंतर लादलेले संवैधानिक निर्बंध कमी करणे आणि पारंपारिक मूल्ये बहाल करण्याचे आश्वासन दिले होते.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles