14.5 C
New York
Saturday, September 30, 2023

Professor Recruitment : विना PhD आणि NET न देता तुम्ही बनू शकतात प्रोफेसर, जाणून घ्या UGC चा नियम

Professor Of Practice : महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रोफेसरची नोकरी मिळवण्यासाठी नेट (NET-National Eligibility Test)  परीक्षा किंवा कोणत्याही विषयात पीएचडी (PhD) करणे अनिवार्य होतं. परंतु आता विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) प्रोफेसर भरतीच्या नियमावलीत बदल करण्याच्या विचारात आहे. नियमानुसार, आता प्रोफेसर भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा डिग्रीची आवश्यकता राहाणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच UGC च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रोफेसर भरतीच्या संदर्भात लवकरच नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे.Also Read – Alia Bhatt Maternity Photoshoot : कसली हॉट दिसतेय आलिया भट्ट, मॅटेलिक गाऊनमध्ये केलं मॅटरनिटी फोटोशूट

UGC ने प्रोफेसर भरतीबाबत नवे नियम बनवले आहेत. आधी प्रोफेसरपदासाठी औपचारिक पात्रता परीक्षा (NET- National Eligibility Test) किंवा PhD ची डिग्री गरजेची होती. आता UGC ने आता प्रोफेसर भरती प्रक्रियेला प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस (Professor Of Practice) असे नाव दिले आहे. या माध्यमातून 10 टक्के प्रोफेसरांची भरती करण्यात येणार आहे . प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या माध्यमातून असिस्टेंट प्रोफेसर भरले जाणार आहेत. Also Read – T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहची टी 20 वर्ल्ड कपमधून माघार- रिपोर्ट

UGC च्या नव्या नियमानुसार,विज्ञान, इंजीनियरिंग, मीडिया, साहित्य, उद्यमिता, सामाजिक विज्ञान, ललित कला, सशस्त्र बल आणि सिव्हिल सेवांसारख्या विषयात प्रोफेसरपदासाठी भरती करण्यात येणार आहे. Also Read – Rashmika Mandanna : रश्मिकाचा हॉट अंदाज आणि चेहऱ्यावरील 'ते' भाव पाहून तुम्ही व्हाल अस्वस्थ… पाहा Photo

काय असेल पात्रता?

प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिस (पीओपी) साठी किमान 15 वर्षांचा महाविद्यालयात शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे. एखादा विषय तुम्ही मागील अनेक वर्षांपासून शिकवत असाल तर तुम्ही त्यात मास्टर आहात, असे समजले जाईल. त्यामुळे तुमच्याकडे महाविद्यालयात शिकवण्याचा अनुभव असेल तर तुम्ही प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिससाठी अर्ज करू शकतात.

पीओपी (POP) मॉडल आधीच अनेक ठिकाणी लागू करण्यात आले आहे. स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी, मॅसाच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) आणि हार्वर्ड यूनिव्हर्सिटीसारख्या दिग्गज विद्यापीठात प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिसनुसार (पीओपी) प्रोफेसर भरती करण्यात आले आहेत.

आपल्या देखील आयआयटीसारख्या दिग्गज संस्थेत देखील पीओपी मॉडल आधीपासून लागू आहे. आयआयटी दिल्ली, गुवाहाटी आणि चैन्नईमध्ये या मॉडलनुसार प्रोफेसर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता इंजिनियरिंगपासून इतर विषयात देखील पीओपी मॉडल लागू करण्यात येणार आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles