Pune Crime : मानधन मायक्रो फायनान्स (Mandhan Micro Finances Company) नावाच्या खोट्या संस्थेमार्फत कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवून 100 ते 150 सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बंटी- बबलीला (Bunty Babli Gang) पुणे पोलिसांनी (Pune Police) सुरत (Surat Gujarat) येथून अटक केली. हेमराज जीवनलाल भावसार (वय- 38) आणि दिपाली जितेंद्र पौनीकर (वय- 32) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही सुरतमधील सुमन सार्थक सोसायटी सिंगनपूर येथील रहिवासी असून युट्युबवर (You Tube) हीरो आणि हिरोईन (Hero-Heroine) म्हणून प्रचलित आहेत.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघा बंटी बबलीने मायक्रो फायनान्स नावाची खोटी संस्था स्थापन केली. पुण्यातील मुकुंद नगर परिसरात या कंपनीचे कार्यालय थाटले. त्यानंतर अनेक गरजू लोकांना पंधरा दिवसांत कर्ज उपलब्ध करून देतो, असं खोटं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लाटले. या दोघांनी जवळपास 100 ते 150 लोकांची 12,30000 रुपयांची फसवणूक केली. स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी गुजरात या ठिकाणी जाऊन या दोघांना अटक केली. त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? किंवा फसवणूक करणारी त्यांची कुठली टोळी आहे का? लोकांकडून घेतलेली रक्कम त्यांनी कुठे ठेवली याचा तपास आता स्वारगेट पोलीस करत आहे. या दोघांना 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली आहे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल