Pune News : पुण्यातील (Pune Crime)निगडी (Nigadi)येथील गंगानगर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 27 वर्षीय तरुणीचा पाठलाग करत चार जणांनी मिळून तिच्यासोबत क्रूर पद्धतीने अत्याचार केल्याचे समोर आले. या नराधमांनी तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबली. डोळ्यात देखील मिर्ची टाकली. यासोबतच तिच्या कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारु ओतली. ते एवढ्यावरच थांबले नाही तिच्या शरीरावर तरुणांनी ब्लेडने वार करत पळ काढला. याविरोधात पीडित तरुणीच्या बहिणीने पोलिसात तक्रार दिली. यानंतर एका आरोपीला पोलिसांनी (Pune police) अटक केली आहे.Also Read – Chandni Chowk Bridge Demolished Video : 600 किलो स्फोटके वापरून पाडला चांदणी चौकचा पूल, पाहा व्हिडिओ!
शौचालयात लपली होती तरुणी
गुरुवारी सकाळची ही घटना आहे. पीडित तरुणी गुरुदेवनगर (Gurudevnagar) येथून जात होती. दरम्यान रस्त्यावर कणीस घेत ती उभी होती. यावेळी आरोपी घाडगे याच्या सांगण्यावरून 3 आरोपी या ठिकाणी आले. यामधील एकाने कोयता काढ हिला पकडू असे म्हटल्याने तरुणी घाबरली. या नराधमांच्या भीतीने तिने पळ काढला. धावत असतानाच ती पांढरकर सभागृहाच्या मागील गुरुदेवनगर येथील सार्वजनिक शौचालयामध्ये लपून बसली. मात्र आरोपींनी तिने शोधले आणि शौचालयात देखील गेले. तेथे त्यांनी तरुणीच्या अंगावर दारु ओतली, तिच्या तोंडात आणि डोळ्यात मिरची टाकली. एढेच नाही तर तिच्या गुंप्तांगावर देखील दारु ओतली. यानंतर ब्लेडने वार करत तिचे कपडे फाडले आणि तिच्यावर वार देखील केले. यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!
तरुणीच्या बहिणीची पोलिसात धाव
या घटनेनंतर पीडित तरुणीच्या 32 वर्षीय बहिणीने पोलिसात तक्रार केली आहे. या तरुणीने निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी चेतन मारुती घाडगे याच्यासह तीन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर चेतन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर तीन आरोपींचा शोध पोलिस घेत आहे. घटनेचा पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना या चिंतेचे कारण ठरत आहेत. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!