8.9 C
New York
Saturday, December 9, 2023

NIA Raids on PFI: पीएफआय विरोधातील कारवाई सुरुच, राज्यातील विविध शहरात छापेमारी; औरंगाबादेतून 13 जण ताब्यात!

NIA Raids on PFI: एनआयएकडून (NIA) पीएफआयवर (PFI ) कारवाई करणे सुरुच आहे. देशभरातील विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे. एनआयएसोबतच इतर तपास यंत्रणा या देशभरातील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (Popular Front of India) च्या ठिकाणांवर छापेमारी करत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक शहरांमध्येही ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबादेतून (Aurangabad) 13 जणांचा ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यासोबतच एटीएसने नांदेड (Nanded) मधूनही एका सदस्याला अटक केली आहे.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

औरंगाबादेतून 13 जण ताब्यात

औरंगाबादमध्ये आज पहाटेच शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व लोक पीएफआयशी संबंधित आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये काही पीएफआयचे सदस्य आहेत तर काही सचिव आहेत. या सर्वांवर गेल्या काही दिवसांपासून पोलिस नजर ठेवून होते. एटीएसच्या चौकशीमध्ये ही माहिती पुढे आली होती. यानंतर शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. शहरातून 13 तर मराठवाड्यातून इतर ठिकाणाहून 7 असे तब्बल 21 लोकांना अटक झाली आहे. पहाटे 3 वाजता हे कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. या सगळ्यांना आज दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार ही प्रतिबंधतामक कारवाई असल्याची माहिती मिळत आहे. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!

नांदेडमधून एक अटकेत

एटीएसने नांदेड मधून पीएफआयच्या आणखी एका सदस्याला अटक केली आहे. पीएफआयचा सदस्य मोहम्मद आबेद अली याला एटीएसकडून अटक करण्यात आली. यापूर्वी 22 सप्टेंबर नांदेड मधून एकाला तर परभणी मधून 4 जणांना अटक करण्यात आली होती. तर नांदेडमधील मोहम्मद आबेद हा सापडला नव्हता. काल एटीएसने त्यालाही अटक केली. या आरोपींविरुद्ध मुंबईत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Also Read – Firing in Mumbai: कांदिवलीत गोळीबार! दोन तरूणांनी दुचाकीवरुन येत केली फायरिंग; एकाचा मृत्यू

आठ राज्यांमध्ये छापेमारी

एनआयएकडून काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारी सुरु केली आहे. यामध्ये आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेतले आहे. आज देखील देशभरात कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या जात आहेत. यामध्ये अनेक पीएफआय सदस्यांना अटक करण्यात आले आहे. कर्नाटक पोलिसांकडून आज सकाळी जिल्ह्यातील पीएफआय अध्यक्ष आणि एसडीपीआय सचिवाला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles