Railways Ticket Transfer : रेल्वे (Indian Railway) हे असे प्रवासाचे माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये भारतभर प्रवास करु शकता. रेल्वेचा प्रवास प्रवाशांना परवडणारा असल्यामुळे याला खूप चांगली पसंती मिळते. रेल्वेला मिळणारा प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता रेल्वे प्रशासन (Railway Administration) प्रवाशांसाठी नवनवीन टेक्निकल बदल करत असते. रेल्वे प्रवाशांना (Railway Passengers) प्रवास करताना कोणताही त्रास होऊ नये त्याचसोबत त्यांना चांगल्या सोयी -सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. अशामध्ये रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या हितासाठी अनेक नियमांमध्ये (Railway Rules) देखील बदल करत असते. अशाच एका नियमाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या नियमाचा फायदा प्रवाशांना होत आहे.Also Read – Railway Employees Bonus : आनंदवार्ता! रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा बोनस, जाणून घ्या किती पैसे मिळणार!
रेल्वे प्रवास करण्यासाठी तुम्ही तिकीट (Railway Ticket) काढले. पण काही कारणास्तव किंवा काही कामानिमित्त तुम्हाला तुमच्या रिझर्वेशन रद्द करावे लागले तर त्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीला प्रवास करण्यासाठी पाठवण्यात अडथळे येत होते. अशावेळी तुम्हाला पुन्हा रिझर्वेशन (Railway Ticket Reservation) करुन त्या व्यक्तीला तिकीट घ्यावे लागते. त्यासाठी वेळही जातो आणि पैसा देखील खर्च होतो. पण अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा तिकीट मिळेल की नाही याची काहीच शाश्वती नसते. प्रवाशांच्या याच अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशासनाने तिकीट रिझर्वेशनच्या नियमात काही बदल केले आहेत. त्याचा फायदा आता प्रवाशांना होणार आहे. Also Read – Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या… आता आरक्षित तिकीट रद्द केल्यास कापली जाणार मोठी रक्कम
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हितासाठी तिकीटाच्या नियमामध्ये बदल केला आहे. या नियमांनुसार, जर तुमचे रिझर्वेशन आधीच झाले आहे आणि काही कारणास्तव तुम्हाला तुमचे रिझर्वेशन कॅन्सल करावे लागते. पण हेच तिकीट तुम्हाला घरातील अन्य व्यक्तीला द्यायचे असेल तर तुम्ही तिकीट ट्रान्सफर (Ticket Transfer) करु शकता. आई, बाबा, बहिण, भाऊ, नवरा, बायको यांपैकी कोणालाही तुम्ही तुमचे तिकीट देऊ शकणार आहात. पण ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट ट्रान्सफर करत आहात ती व्यक्ती तुमच्या ओळखीची असणे गरजेचे आहे. Also Read – Indian Railways: सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा प्रवाशांना झटका, 24 रेल्वे गाड्या रद्द
असे करा तिकीट ट्रान्सफर –
– यासाठी तुम्हाला तुमची ट्रेन सुटण्याआधी आरक्षण केंद्रावर जावे लागेल.
– आरक्षण केंद्रावरुनच तुम्ही तिकीट ट्रान्सफर करु शकता.
– याकरिता कुटुंबातील व्यक्तीला स्वतःचे ओळखपत्र काउंटरवर द्यावे लागेल.
– तुम्हाला काउंटरवर अर्ज (Application) देखील करावा लागेल.
– यानंतर बुकिंग क्लर्क पीएनआर (PNR) नंबरच्या तिकीटावर दुसऱ्या व्यक्तच्या नावावर तिकीटाची नोंदणी करुन देतील.
– अशा पद्धतीने तिकीट ट्रान्सफर करुन तुमच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती प्रवास करु शकतो.