1.2 C
New York
Thursday, November 30, 2023

Rakhi Sawant : राखी सावंतसोबत लग्न करण्यास बॉयफ्रेंड आदिलचा नकार, सांगितले ‘हे’ कारण!

Rakhi Sawant: राखी सावंत (Rakhi Sawant) काहीना काही कारणांमुळे दररोज चर्चेत असते. अनेकांना राखी सावंत आवडते, तर अनेकांना ती अजिबात आवडत नाही. मात्र तिला कशासाच काहीच फरक पडत नाही. ती तिचं आयुष्य हवं तसं जगतत असते. सध्या राखी बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत (adil durrani) रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा आदिल राखीला महागड्या भेटवस्तू द्यायचा. राखी आणि आदिल दोघेही एकत्र खूप आनंदी दिसतात. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण या सगळ्यामध्ये आता राखी आणि आदिलच्या (Rakhi adil relationship) नात्यात दुरावा निर्माण झाल्याची बातमी समोर येत आहे. हे दोघं लवकरच लग्न करणार असेही वृत्त होते. मात्र आता बॉयफ्रेंड आदिलने राखीसोबत (Rakhi sawant boyfriend) लग्न करण्यास नकार दिला आहे.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन

आदिलने दिले लग्न न करण्याचे ‘हे’ कारण

एका मुलाखतीदरम्यान आदिलने एक मोठा खुलासा केला होता. आदिल म्हणाला होता की राखी सावंत त्याच्यावर खूप संशय घेते. राखीला वाटते की तो अजूनही त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत बोलतो. तसेच तिच्याकडे जातो. आदिलने असेही सांगितले होते की, जेव्हा तो त्याच्या घरी जायचा तेव्हा राखी त्याच्यावर संशय घ्यायची. राखीने त्याच्या हेरगिरीसाठी काही लोकांना पाठवले होते. राखी खूप इन्सिक्योर आहे असे आदिलला वाटते. अशा परिस्थितीत जर ती कुटुंबाचाही सहभाग असेल तर अडचण निर्माण होईल. राखी अत्यंत इन्सिक्योर असल्याने तो राखी सावंतसोबत लग्न करू शकत नाही, असे आदिलचे म्हणणे आहे. त्यामुळे तो लग्न पुढे ढकलत आहे. Also Read – Nobel Prizes 2022 Medicine: स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर!

राखीला करायचे आहे आदिलसोबत लग्न

मात्र राखी सावंतने आदिल दुर्राणीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राखी सलमान खानला आपला भाऊ मानते. अशा परिस्थितीत सलमान खानने आदिलच्या आई-वडिलांशी लग्नासाठी बोलावे, अशी राखीची इच्छा आहे. राखी सावंत अखेरच्या वेळी रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 15’ मध्ये तिचा एक्स पती रितेशसोबत छोट्या पडद्यावर दिसली होती. मात्र, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोघेही वेगळे झाले. सध्या राखी सावंत आदिलसोबत आहे. Also Read – Alia Bhatt Maternity Photoshoot : कसली हॉट दिसतेय आलिया भट्ट, मॅटेलिक गाऊनमध्ये केलं मॅटरनिटी फोटोशूट

काही महिन्यांपूर्वी राखीने करुन दिली होती आदिलची ओळख

काही महिन्यांपूर्वी राखी सावंतने आदिलची मीडियाशी ओळख करून दिली होती. राखीने आदिल तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले होते. दोघांचे क्यूट व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. दोघेही अनेक चॅनलवर मुलाखती देताना दिसतात. अनेकदा दोघेही दुबईला जातात. राखी सावंतने नुकतेच दुबईत घर खरेदी केले आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles