Ram Charans Cameo : बॉलिवूडचा (Bollywood) ‘सुलतान’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि साऊथचा सुपरस्टार राम चरण (South Superstar Ram Charan) एकाच पडद्यावर दिसणार आहेत. सलमान खानच्या आगामी चित्रपटामध्ये राम चरण एन्ट्री घेणार आहे. राम चरण आणि सलमानच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जेव्हा ही बातमी राम चरणच्या चाहत्यांना कळाली तेव्हापासून ते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.Also Read – Alia Bhatt Maternity Photoshoot : कसली हॉट दिसतेय आलिया भट्ट, मॅटेलिक गाऊनमध्ये केलं मॅटरनिटी फोटोशूट
सलमान खानच्या ‘गॉडफादर’ (Godfather Movie) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचसाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सलमान खान आणि चिरंजीवी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान दोघांनी चित्रपटाविषयी अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमातच सलमान खानने सर्वांना आनंदाची बातमी दिली खास म्हणजे राम चरणच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच आनंददायी आहे. कारण सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie) राम चरणची एन्ट्री होणार आहे. Also Read – गोल्डन आणि सिल्वर कलरच्या ड्रेसमध्ये Tamannaah Bhatia चे बोल्ड फोटोशूट!
View this post on Instagram
Also Read – Mahatma Gandhi Jayanti: महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पाहा त्यांच्या जीवनावर आधारित 'हे' बॉलिवूड चित्रपट!
सलमान खानने यावेळी साऊथ सुपरस्टार राम चरणसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असल्याचे सांगितले. सलमान खानने यावेळी सांगितले की, ‘ही खरी गोष्ट आहे. आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो. मी वेंकी उर्फ व्यंकटेश डग्गुबतीसोबत शूटिंग करत असल्याने राम चरण मला भेटायला आला. तो म्हणाला मला तुझ्यासोबत काम करायचे आहे, मी नाही म्हणालो, मग तो म्हणाला मला तुझ्यासोबत काम करायचे आहे आणि मला तुझ्या आणि वँकीसोबत पडद्यावर यायचे आहे.’
सलमान खानने पुढे सांगितले की, ‘मला वाटले की तो मस्करी करतोय, म्हणून मी म्हणालो की ठीक आहे. पण दुसऱ्या दिवशी तो व्हॅन, कपडे आणि बाकी सगळ्या गोष्टी घेऊन सेटवर तयार होता. मी त्याला पाहून आश्चर्यचकित झालो. मी त्याला विचारलं, तू इथे काय करतोस? त्यावर तो म्हणाला, तू मला खूप आवडतोस मला तुझ्यासोबत काम करायचं आहे, तू मला ते करुदे. त्यावर मी तयार झालो आणि आम्ही एकत्र काम केलं.’