1.2 C
New York
Thursday, November 30, 2023

Akshay Kuamr च्या ‘राम सेतु’चा धमाकेदार टीझर रिलीज, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली!

Ram Setu Teaser : बॉलिवूडचा (Bollywood) ‘खिलाडी’ अर्थात सुपरस्टार अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित ‘राम सेतु’ चित्रपट (Ram Setu Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत अक्षयच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशामध्ये या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. राम सेतूच्या या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली असून ते चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.Also Read – Alia Bhatt Maternity Photoshoot : कसली हॉट दिसतेय आलिया भट्ट, मॅटेलिक गाऊनमध्ये केलं मॅटरनिटी फोटोशूट

अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ या चित्रपटानंतर आता ‘राम सेतु’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे (Ram Setu Released Date). नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून त्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा नवा लूक पाहायला मिळत आहे. दमदार अ‍ॅक्शन सीन्सने भरलेल्या या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वत: अक्षय कुमारने हा टीझर आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अवघ्या दोन तासांत याला साडेचार लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. Also Read – Viral Video: तुम्ही म्हशीला डान्स करताना कधी पाहिलंय का?, हा व्हिडिओ पाहून व्हाल आश्चर्यचकीत!

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Also Read – गोल्डन आणि सिल्वर कलरच्या ड्रेसमध्ये Tamannaah Bhatia चे बोल्ड फोटोशूट!

या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मुख्य भूमिकेत आहे. त्यासोबतच अभिनेत्री नुसरत भरुचाही (Nushratt Bharuccha) चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि जॅकलिनचा लूक सर्वांना खूपच आवडला. टीझरवरुनच हा चित्रपट बिग बजेट असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये म्हणजेच 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles