10.4 C
New York
Wednesday, February 8, 2023

Ravivar Che Upay: रविवारी करा ‘हे’ 10 उपाय, जीवनातील सर्व अडचणी होतील दूर  

Ravivar Che Upay: सुख-सुविधा युक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने कष्ट करत असतो. यात काहींना सहज यश मिळते तर काहींना मेहनत करूनही यश लाभत नाही. यशस्वी (Success Tips) होण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय (Jyotish Remedy) सांगण्यात आले आहेत. रविवारी हे उपाय केल्यास जीवनातील अडथळे दूर होत यश मिळते. कारण रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. ज्योतिष शास्त्रात (Jyotish Shastra Tips) सूर्याला (Lord Surya) ग्रहांचा राजा मानले जाते. रविवारी काही उपाय केल्याने सूर्य देव प्रसन्न होत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊया रविवारच्या उपायांसंदर्भात अधिक माहिती.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

रविवारी करा हे 10 प्रभावी उपाय

  1.  रविवारी सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी शिव मंदिरात माता गौरी आणि भगवान शंकर यांना रुद्राक्ष अर्पण केल्यानेही माता लक्ष्मी प्रसन्न होते.
  2. रविवारी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी निघण्यापूर्वी गाईला पोळी खायला द्यावी. असे केल्याने त्या कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते.
  3. घरात सुख, समृद्धी आणि देवाची कृपा लाभण्यासाठी रविवारी आदित्य स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर ठरते. यासह रविवारी कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी काहीतरी गोड खाऊन पाणी प्यावे.
  4. जीवनात प्रगती करण्यासाठी तांदूळ, दुध आणि गूळ मिसळून खावे. यासह लाल कपड्यात बांधून गहू आणि गूळ दान करा.
  5. कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी पाण्यात गूळ आणि तांदूळ मिसळून ते नदीत प्रवाहित करावे. असे केल्याने समस्या दूर होत सकारात्मक फळ प्राप्त होते.
  6. रविवारी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध बाजूला ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून ध्यान करावे. नंतर बाभळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध टाकावे. हा उपाय 7 ते 11 आठवडे केल्यास नक्कीच फळ मिळते आणि धनलाभ होतो.
  7. रविवारी निळा, काळा, आणि करड्या रंगाचे कपडे घालू नये. यासह शक्य असल्यास बूट घालणे देखील टाळावे.
  8. धनप्राप्तीसाठी रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करून घरी आणा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे तीन झाडू दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवा. झाडू ठेवताना लक्षात असू द्या की, तुम्हाला कोणी टोकू नये.
  9. रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चारमुखी दिवा लावा. हा उपाय केल्याने धनलाभ होतो आणि पैशाचा बचत वाढते.
  10. धनहानीच्या समस्येवर मात करण्यासाठी रविवारी तलाव किंवा नदीच्या काठावर जाऊन माशांना पीठ खाऊ घाला.

(टीम: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. India.Com याचे समर्थन करत नाही. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.) Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles