0.9 C
New York
Thursday, November 30, 2023

RBI ने बदलले Bank Locker शी संबंधित नियम, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी घ्या जाणून!

Bank Locker New Rules : बँकेच्या लॉकरमध्ये (Bank Locker) तुम्ही जर मौल्यवान वस्तू ठेवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) ग्राहकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन बँक लॉकरच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. RBI ने पुन्हा एकदा बँक लॉकरशी संबंधित नियम (Bank Locker New Rules) बदलले आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेत लॉकर घेतले असेल आणि त्यात तुमचे सोने-चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या असतील तर आरबीआयने (RBI) जे लॉकरसंदर्भात नवीन नियम काढले आहेत ते जाणून घेणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल.Also Read – तुमचेही PPF Account एक्सपायर झालेय?, हे काम लवकर करुन करा रिकव्हर!

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, बँकेत लॉकर घेणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवरून रिझर्व्ह बँकेने लॉकरसंदर्भातील नियम बदलले आहेत. बऱ्याचदा बँक लॉकरमध्ये चोरी होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येतात. पण यापुढे लॉकरमधून काही वस्तू चोरीला गेल्यास, ग्राहकाला संबंधित बँकेकडून लॉकरच्या भाड्याच्या 100 पट भरपाई दिली जाणार आहे. आरबीआयच्या या नव्या नियमामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Also Read – Bank Holidays List October 2022 : ऑक्टोबरमध्ये 10 दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

चोरीच्या घटनांपासून बँका निसटत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशावेळी बँका ग्राहकांना सांगतात की यामध्ये त्यांची कोणत्याही प्रकारची जबाबदार नाही. पण आता आरबीआयने जारी केलेल्या लॉकरसंदर्भातील नव्या नियमांनुसार, आरबीआयने दिलेल्या आदेशात बँकांना रिकाम्या लॉकरची यादी, लॉकरसाठी प्रतीक्षा यादी क्रमांक डिस्प्लेवर ठेवावा लागेल. यामुळे लॉकर सिस्टममध्ये अधिक पारदर्शकता येईल. आरबीआयच्या मते, बँकेच्या वतीने ग्राहकांना अंधारात ठेवता येणार नाही. Also Read – Credit, Debit Card Tokenisation: 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट, डेबिट कार्ड टोकनाइज करावे लागणार; जाणून घ्या का आणि कसे करावे?

जेव्हा तुम्ही बँक्चेया लॉकरमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला बँकेमार्फत ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट केले जाईल. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आरबीआयने हा नवीन नियम तयाार केला आहे. बँकांना लॉकरचे भाडे एकावेळी जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी घेण्याचा अधिकार आहे. जर लॉकरचे भाडे 2,000 रुपये असेल तर बँक तुमच्याकडून इतर देखभाल शुल्क वगळता 6,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू शकत नाही.

महत्वाचे म्हणजे, बँकांच्या लॉकर रूममध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्यांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय बँकांना यापुढे 180 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे लागणार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने चोरी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाल्यास पोलिस तपास करू शकतील.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles