14.5 C
New York
Saturday, September 30, 2023

Rule Changes from 1st October : 1 ऑक्टोबरपासून तुमच्या खिशावर पडणार ताण, या नियमात होणार मोठे बदल!

Rule Changes from 1st October : सप्टेंबर महिना (September Month) संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल (Rule Changes from 1st October ) होणार आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून बँकिंग नियम, एलपीजीच्या दर यासारख्या अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल कोण- कोणते असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत….Also Read – Indonesia Football Match Violence: मृत्यूतांडव! इंडोनेशियात फुटबॉलची मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे समर्थक आमने-सामने, हिंसाचारात 129 जणांचा मृत्यू

म्युच्युअल फंडाच्या नियमांमध्ये बदल –

1 ऑक्टोबर किंवा त्यानंतर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनी नामांकन तपशील देणे आवश्यक असेल. त्याचबरोबर असे न करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक डिक्लेरेशन भरावे लागेल. डिक्लेरेशनमध्ये नामांकनाची सुविधा द्यावी लागेल. यापूर्वी हा नियम 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार होता मात्र तसे होऊ शकले नाही आणि ही मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता पुढील महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर हे लक्षात ठेवा. Also Read – Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

Card Tokenisation नियम लागू –

देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. 1 ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. या पूर्वी हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता. पण आरबीआयने ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून केली होती. त्यानंतर आरबीआयने 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू करणार असल्याचे जाहीर केले होते. आता 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे. Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

अटल पेन्शेन योजनेचा फायदा मिळणार नाही –

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 5,000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंतच्या वयाची कोणतीही व्यक्ती या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकते. पण आता 1 ऑक्टोबरपासून या योजनेत बदल होणार आहे. नव्या नियमांनुसार, आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही करदाते असाल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचीच संधी आहे.

डिमॅट अकाउंट –

शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी डिमॅट अकाउंट हे खूपच गरजेचे असते. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आता डिमॅट अकाउंटधारकांसाठी Two Factor Authentication करणे आवश्यक आहे. तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये Two Factor Authentication चा पर्याय 30 सप्टेंबरपर्यंत Enable करावा लागणार आहे. असे केले नाही तर तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट सुरू करता येणार नाही.

रेपो दर –

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण आढावा बैठक येत्या आठवड्यात होणार आहे. रिझर्व्ह बँक 30 सप्टेंबर रोजी व्याज दर जाहीर करणार आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जे महाग होणार आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत होऊ शकतो बदल –

दर महिन्याच्या 1 तारखेला सिलिंडरच्या किमती बदलतात. 1 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात. जर कंपनीने एलपीजीच्या किमतीत बदल केला तर किमती कमी होण्याची किंवा वाढण्याची शक्यता आहे.

हा नियम फूड बिझनेस ऑपरेटर्सना लागू होणार –

फूड सेफ्टी रेग्युलेटर FSSAI ने 1 ऑक्टोबर 2021 पासून फूड बिझनेस ऑपरेटर्सना FSSAI परवाना क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक रोख पावत्यांवर नमूद करणे बंधनकारक केले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या आदेशानुसार, ‘परवाना आणि नोंदणी अधिकार्‍यांना धोरणाची व्यापक प्रसिद्धी देण्याचे आणि 2 ऑक्टोबर 2021 पासून त्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.’

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles