3.2 C
New York
Wednesday, February 1, 2023

SAIL Recruitment 2022 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 333 विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती!

SAIL Recruitment 2022 : नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL Recruitment 2022) नोकरीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (Steel Authority of India Ltd) विविध पदांच्या 333 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते SAIL ची अधिकृत वेबसाईट www.sail.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात.Also Read – FCI Recruitment 2022 : भारतीय खाद्य निगममध्ये 5043 पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या अधिक माहिती!

SAIL ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एक्झिक्युटिव्ह – असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी), नॉन-एक्झिक्युटिव्ह – ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर), माइनिंग फोरमन, सर्व्हेअर,माइनिंग मेट, फायर ऑपरेटर, फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी) या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 333 रिक्त पदं भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून 30 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना वाचावी. Also Read – Job Search 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती, इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्यांनी करा अर्ज!

SAIL Recruitment 2022 :  महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु. Also Read – India Post Recruitment 2022 : आठवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सूवर्ण संधी, आजच करा अर्ज  

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 सप्टेंबर 2022

SAIL Recruitment 2022 :  पदांचा तपशील –

– एकूण पदं – 333 पदं

– एक्झिक्युटिव्ह – असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) – 8 पदं

– नॉन-एक्झिक्युटिव्ह – ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) – 39 पदं

– माइनिंग फोरमन – 24 पदं

– सर्व्हेअर – 5 पदं

– माइनिंग मेट – 55 पदं

– फायर ऑपरेटर – 25 पदं

– फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी) – 36 पदं

SAIL Recruitment 2022 :  शैक्षणिक पात्रता –

– एक्झिक्युटिव्ह – B.E./B.Tech., फायर सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा,२ वर्षांचा अनुभव असावा.

– नॉन-एक्झिक्युटिव्ह – ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर) – 10वी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र असावे.

– माइनिंग फोरमन – 10वी उत्तीर्ण, माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, फोरमन प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव असावा.

– सर्व्हेअर – 10वी उत्तीर्ण, माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा, माईन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव असावा.

– माइनिंग मेट – 10वी उत्तीर्ण, माइनिंग मेट प्रमाणपत्र, 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

– फायर ऑपरेटर – कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग डिप्लोमा, सब ऑफिसर कोर्स, अवजड वाहन चालक परवाना असावा.

– फायरमन-कम-फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी) – 10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

SAIL Recruitment 2022 :  वयोमर्यादा –

या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 18 वर्षे आणि किमान वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

SAIL Recruitment 2022 :  अधिक माहिती जाणून घेण्यासाठी –

– या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in वर जावे

– वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करावे.

– jobs मध्ये Rourkela Steel Plant -RECRUITMENT OF VARIOUS TECHNICAL POSTS IN ROURKELA STEEL PLANT या लिंकवर क्लिक करा.

– तिथे दिलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचा.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles