25 C
New York
Tuesday, June 6, 2023

Dussehra Melava 2022 : खरी शिवसेना कोणाची? दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू झालं पोस्टर वॉर

Dussehra Melava 2022 : राज्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला असताना ठाकरे गट (Shiv Sena Chief Udhav Thackeray) आणि शिंदे गटात (Maharashtra CM Eknath Shinde) दसरा मेळाव्यावरून पोस्टर वॉर सुरू झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी (Shiv Sena Dussehra Melava)  शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. दोन्ही गटाने शक्तीप्रदर्शनासाठी आतापासून जोरदार तयार सुरू केली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापल्या दसरा मेळाव्यासाठी पोस्टर्स रिलिज केले आहेत.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

‘काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे’ अशा आशयाचं पोस्टर मातोश्रीच्या परिसरात झळकलं आहे. ‘वाजतगाजत गुलाल उधळत शिस्तीने या चला शिवतीर्थावर’ असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी पोस्टरच्या माध्यमातून केला आहे. तर आमचं एक पाऊल पुढे असं दाखलत शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची दोन पोस्टर्स रिलिज करण्यात आली आहेत. एका पोस्टरवर ‘आम्ही विचारांचे वारसदार’ तर दुसऱ्या पोस्टरवर ‘हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या पोस्टरवर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंदत आनंद दिघे यांचे छायाचित्र आहे. शिंदे गटाच्या पोस्टर्सवर देखील ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ असा उल्लेख करण्यात आला असून त्यावर धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देखील आहे. त्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपण्याची शक्यता आहे. तर खरा शिवसेनेचा दसरा मेळावा ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? असा संभ्रम राज्यभरातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

शिंदे गटाची काय सुरू आहे दसरा मेळाव्याची तयारी..

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी सुमारे 7000 बस मुंबईत आणल्या जाणार आहेत. जवळपास 3000 एसटी बसेत तर 4000 खासगी बसेस असतील. या वाहनांमधून अडीच ते तीन लाख शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचचे समजते. याबाबत नियोजन करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यात सरकारमधील मंत्री, आमदार आणि खासदारांकडे विशेष जबाबदार सोपवण्यात आली आहे. Also Read – Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles