25 C
New York
Tuesday, June 6, 2023

Skin Care Tips: त्वचेच्या समस्यांसाठी करा हा सोपा घरगुती उपाय; ग्लो करेल त्वचा, आकर्षक दिसेल चेहरा

Skin Care Tips: सध्याच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. या अनियमित आणि अनियोजित जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. बदलत्या ऋतुसोबत त्वचेची समस्या (Skin Problem) अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे बहुतेक लोक त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत.  आपल्या त्वचा मुलायम, स्वच्छ आणि नितळ दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.  यासाठी काहीजण महागड्या औषधींचा वापर करतात, तर काही लोक इतर सौंदर्य प्रसाधने (Beauty Treatment) वापरतात.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

बाजारात उपलब्ध असलेल्या या औषधी आणि सौंदर्य उत्पादनांचा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय (Home Remedy) करून तुमची त्वचा निरोगी आणि ताजेतवानी ठेवू शकतात. तसेच हे उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य अगदी कमी किमतीत आणि सहज उपलब्ध होते. त्वचेसाठी तुम्ही तुरटीचाही वापर करू शकता. तुरटी कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते. तुरटीच्या मदतीने तुम्ही त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतात. तुम्हाला मुरुम किंवा त्वचेच्या इतर समस्या असतील तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या लेखात आपण तुरटी पावडरच्या मदतीने त्वचेच्या समस्येवर कशी मात केली जाऊ शकते याबाबत जाणून घेऊया. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते तुरटी

त्वचेचा पोत सुधारतो : प्रदूषण, धूळ आणि मातीमुळे त्वचेवर पडलेले डाग दूर करण्यासाठीही तुरटी पावडर खूप उपयोगी ठरते. तुरटीच्या उपायामुळे त्वचेवरील डाग कमी होतात आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

पिंपल्सवर प्रभावी : त्वचेवरील पिंपल्सच्या समस्येवर तुरटी पावडर खूप फायदेशीर ठरते. तुरटीत असलेल्या औषधी गुणधर्मामुळे पिंपल्स कमी होतात आणि त्वचा उजळते.

सुरुकुत्या कमी होतात:  वाढत्या वयामुळे त्वचेवर सुरुकुत्या पडतात काही जणांच्या त्वचेवर कमी वयातच सुरुकुत्या पडण्यास सुरूवात होते. या समस्येवर मत करण्यासाठी तुम्ही तुरटी पावडरचा उपयोग करू शकता. तुरटमीुळे त्वचा ताजी तवाणी राहण्यास महत होते आणि त्वचेवर सुरकुत्या पडण्याची मसस्या टाळता येऊ शकते.

जळजळ कमी होते:  त्वचा रोगाचे अनेक प्रकार आहेत. काही लोकांच्या त्वचेवर काळे पांढरे गाड पडतात. अशा प्रकारच्या त्वचारोगांवर मात करण्यासाठीतुरटीची पावडर खूप प्रभावी ठरते. तुरटीचा वापर केल्यास त्वचेवर होणारी जळजळ आणि लालसरपणाची समस्या कमी करता येऊ शकते. तसेच तुरटीच्या वापराने अनेक प्रकारचे संसर्ग देखील टाळता येतात.

त्वचेवर तुरटी वापरण्याची पद्धत

तुरटी पावडर पाण्यात घालून चेहरा स्वच्छ धुवा, त्यानंतर लगेचच पुन्हा साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. तसेच तुम्ही तुरटी पावडरमध्ये पाण्याचे काही थेंब मिसळून बोटाच्या मदतीने त्वचेवर हलक्या हाताने मालिश करू शकता. हे लक्षात ठेवा की तुरटीचा वापर केल्यास तुमच्या त्वचेवर काही प्रमाणात जळजळ होऊ शकते. मात्र तुम्हाला अतिप्रमाणात जळजळ होत असेल तर लगेच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि तात्काळ त्वचारोग तज्ञाशी संपर्क साधा.  तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.

(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles