Smart Phone: शाओमीने आपले दोन स्मार्टफोन (Smart phone) शाओमी (Xiaomi) नोट 12T आणि शाओमी 12T प्रो लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी दोन्हीही फोन लॉन्च होणार आहेत. संध्याकाळी साडे सात वाजता त्याची लाइव्ह स्ट्रीमिंग केली जाईल. शाओमीच्या Xiaomi 12T Pro स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा असेल असे बोलले जात आहे. यासोबतच अनेक दमदार फीचर्स देण्यात येणार आहेत. शाओमीच्या या दोन्हीही फोनमधील फिचर्सविषयी सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!
असे असू शकतात स्पेसिफिकेशंस
सर्वोत्तम प्रोसेसर
Xiaomi 12T Pro मध्ये एक मजबूत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट मिळण्याची अपेक्षा आहे. हा प्रोसेसर इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम प्रोसेसर आहे. जो सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली मानला जातो. तर Xiaomi 12T फोनमध्ये Dimensity 8100 प्रोसेसर वापरला जाईल. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!
असा असेल कॅमेरा
दोन्ही फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपने सुसज्ज असतील. ज्यामध्ये प्रो वेरिएंटमध्ये 200 मेगापिक्सेल कॅमेरा लेन्स मिळेल असे सांगण्यात आले आहे. रिपोर्टनुसार हा सॅमसंग hp1 ने सुसज्ज असेल. त्याच वेळी, 12T फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा लेन्स दिला जाईल. यासोबतच फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा लेन्स दिला जाऊ शकतो. Also Read – Solapur News: हृदयद्रावक! पत्नीची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी, पहिल्या पत्नीनेही तिथेच दोन मुलांसह दिला होता जीव
असा असेल डिस्प्ले
12T ला 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. तर प्रो मध्ये 6.67-इंचाचा OLED AMOLED डिस्प्ले असेल. डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट उपलब्ध असेल. स्टोरेजच्या बाबतीत, डिव्हाइसमध्ये दोन प्रकारचे स्टोरेज पर्याय दिले जातील. ज्यामध्ये Xiaomi 12T फोन 8GB RAM + 128GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेजसह येईल. तर Xiaomi 12T Pro मॉडेलसाठी 8GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध असेल.
चार्जिंग फिचर्स
बॅटरीच्या बाबतीत, Xiaomi 12T डिव्हाइसमध्ये 67W फास्ट चार्जिंग टेक्निक असणार आहे आणि प्रो व्हेरिएंटमध्ये 120W फास्ट चार्जिंग टेक्निक असणार आहे.