10.4 C
New York
Wednesday, February 8, 2023

Solapur Crime: प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा, मध्यरात्री केला खून; सोलापुरातील धक्कादायक घटना!

Solapur Crime: सोलापुरात (Solapur News)बुधवारी सकाळी हत्येची घटना (Murder case) उघडकीस आली होती. मुळेगाव रोड परिसरातील दशरथ नारायणकर यांचा खून झाला होता. ते गेल्या काही वर्षांपासून पत्नीसोबत सोलापुरात राहत होते. त्यांच्या खुनाची तक्रार पत्नी अरुणा नारायणकर यांनी पोलिसात (Solaur police) केली होती. यानंतर अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. सुरुवातीला आर्थिक व्यवहारांमधून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र नंतर मृताची पत्नीच आरोपी असल्याचे समोर आले. पत्नीने (Wife killed Husband)अनैतिक संबंधांमधून प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचाच काटा काढला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

गेल्या काही वर्षांपासून पत्नीसोबत राहत होता दशरथ

दशरथ नारायणकर हे गेल्या काही वर्षांपासून पत्नीसोबत सोलापुरात राहात होता. तो मुळचा अक्कलकोट तालुक्यामधील डोंबरजवळगे या गावातील रहिवासी आहे. दरम्यान दशरथ नारायणकर यांची हत्या झाली. या हत्येची तक्रार पत्नीने पोलिसांकडून केली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांना पत्नीवर संशय आला. तपासामध्ये पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आल्याने त्यांनी पत्नीची चौकशी करायला सुरुवात केली. यावेळी पत्नीने अपेक्षित न उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय वाढत गेला. मृताच्या पत्नीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून बाबासो बाळशंकर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!

सापळा रचून प्रियकराला शोधले

पत्नीची चौकशी सुरु असतानाच पोलिसांनी तिचा प्रियकर बाबासो बालशंकर याचाही तपास सुरु केला. यावेळी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी सापळा रचून प्रियकराला शोधून काढले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने मृताच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले. यानंतर त्याने अरुणा हिच्या मदतीनेच दशरत यांची हत्या केल्याचे सांगितले. दरम्यान या दोन्हीही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपासही पोलिसांकडून केला जात आहे. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

मध्यरात्री केला खून

बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दशरथ यांचा त्यांची पत्नी अरुणाच्या प्रियकराने घरात शिरून खून केला. यामध्ये त्याला मृताच्या पत्नीची मदत होती. पत्नीने पतीच्या हत्येसाठी चाकू नायलॉनची दोरी असे काही साहित्य खरेदी केले होते. मात्र नंतर पत्नीने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पत्नीची उडवा उडीवीची उत्तरे ऐकून संशयाची सुई पत्नीकडे वळली आणि पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles