Solapur News: सोलापुरात (Solapur) एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. बार्शी (Barshi)येथील कुसळंब गावात एका महिलेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारुन आपले जीवन संपवले. बाबासाहेब प्रभाकर काशीद यांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत्या. धक्कादायक म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नीने देखील दोन मुलांसह याच विहिरीत उडी मारुन आत्महत्या (Solapur suicide case) केली होती. पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!
दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी
बाबासाहेब काशीद यांच्या दुसऱ्या पत्नी रोहिणी (अनुराधा) बाबासाहेब काशीद असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने अनिश काशीद (दीड वर्षे) आणि अक्षरा काशिद ( 4 महिने) या दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतली. शेतातील विहिरीमध्येच या महिलेने जीव दिला. याविषयीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आहेत. बार्शी येथील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी या तिघांचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!
पाच वर्षांपूर्वीही असेच घडले
बाबासाहेब काशीद यांच्या पहिल्या पत्नीने याच विहिरीत आपल्या दोन चिमुकल्या मुलींसोबत जीव दिला होता. बाबासाहेब काशीद यांच्या पहिली पत्नी अनुराधा बाबासाहेब काशीद यांनी मुलगी अक्षरा (3 वर्षे) आणि आदिती (5 वर्षे)या दोघींना घेऊन विहिरीत उडी घेतली होती. 27 जुलै 2017 रोजी त्यांनी जीवन संपवले होते. त्यानंतर बाबासाहेब काशीद यांनी दुसरा विवाह केला. मात्र पाच वर्षांनंतर त्यांना पुन्हा तिच घटना दुसऱ्यांदा पहावी लागली आहे. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!
बाबासाहेब काशीद यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या नावावरुन दुसऱ्या पत्नीचे नाव देखील अनुराधा असेच ठेवले होते. एवढेच नाही तर त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी अक्षरा हिच्या नावावरुन त्यांनी दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुलीचे नाव ठेवले होते. मात्र पहिल्या दोघींप्रमाणेच या दोघींचाही त्याच विहिरीत मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.