2.9 C
New York
Friday, December 8, 2023

Utkarsh Wankhede ठरला Sur Nava Dhyas Nava चा राजगायक, सुवर्ण कट्यारीसोबत मिळाले इतक्या लाखांचे बक्षीस!

Sur Nava Dhyas Nava Winner : कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा’च्या विजेत्याची (Sur Nava Dhyas Nava Winner) घोषणा करण्यात आली आहे. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. नागपूरचा उत्कर्ष वानखेडे (Utkarsh Wankhede) हा या कार्यक्रमाचा विजेता ठरला असून राजगायकाचा मान त्याने मिळवला आहे. विजेता झाल्यानंतर उत्कर्ष वानखेडेला सुवर्ण कट्यारीसोबत लाखो रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. सध्या सगळीकडे उत्कर्ष वानखेडेचे कौतुक होत आहे.Also Read – Mohammad Faiz ने जिंकली Superstar Singer 2 ची ट्रॉफी, विजेत्याला बक्षीस म्हणून मिळाले तब्बल 15 लाख रुपये!

‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. या कार्यक्रमात राजगायक होण्याचा मान उत्कर्ष वानखेडेने पटकावला. उत्कर्षला भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी – आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते सुवर्ण कटयार देण्यात आली. उत्कर्ष वानखेडेला कलर्स मराठीतर्फे 2 लाख रुपयांचा धनादेश, चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सुवर्ण कटयार देण्यात आली. तसेच केसरी टूर्सतर्फे काश्मीर टूर आणि तोडकर संजीवनी कडून इलेक्ट्रिक स्कूटर भेट म्हणून देण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या महाअंतिम सोहळ्यामध्ये संज्योती जगदाळे ही या पहिली उपविजेती ठरली. संज्योतीला कलर्स मराठीकडून एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसंच, केसरी टूर्सकडून केरला टूर, महाभृंगराज ऑइलकडून 25 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर, आरोही प्रभुदेसाई ही दुसरी उपविजेती ठरली. आरोहीला कलर्स मराठीकडून 75 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर केसरी टूर्सकडून हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून 25 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षीच्या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील आणि देशातील पाच हजार स्पर्धकांनी ऑडिशन दिले होते. 16 स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांनी अतिशय सुंदर गाणी गात प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या सोळा स्पर्धकांमधून महाअंतिम सोहळ्यासाठी सहा शिलेदार मिळाले. यामध्ये आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड या सहा स्पर्धकांच्या नावाचा समावेश होता. या सर्वांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये दमदार परफॉर्मन्स दिले.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles