Swapna Shastra: अनेकदा आपण झोपेत स्वप्न (Dream) पाहतो आणि असे म्हटले जाते की प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. मात्र, स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचा अर्थ काय आहे हे फार कमी लोकांना समजते? त्यामुळे अनेक जण स्वप्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. प्रत्येक स्वप्न हे व्यक्तीला काही ना काही संकेत (Meaning Of Dream) देत असतात. काही स्वप्ने हे सुखाची चाहूल देतात तर काही संकटाचा इशारा देता असतात. स्वप्नाचे अर्थ व त्याचे वर्णन स्वप्न शास्त्रात (Swapn Shastra) केले आहे. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नामागे मोठा अर्थ दडलेला असतो. त्यानुसार जाणून घेऊया स्वप्नात गॅस सिलेंडर दिसण्याचा काय आहे अर्थ.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
स्वप्नात गॅस सिलेंडर दिसण्याचा अर्थ
स्वप्न शास्त्रात प्रत्येक स्वप्नामागे दडलेला अर्थ सांगण्यात आला आहे. प्रत्येक स्वप्न व्यक्तीला एक विशेष संकेत देत असतो. अशात स्वप्नात गॅस सिलेंडर दिसण्याचा अर्थ देखील सांगण्यात आला असून स्वप्नात गॅस सिलेंडर पाहणे स्वप्न शास्त्रानुसार अशुभ मानले गेले आहे. या स्वप्नाचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. हे स्वप्न तुमच्या आयुष्यात काही मोठे अपघात होणार असल्याचे संकेत दर्शवते. अशात व्यक्तीने विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. स्वप्न शास्त्रात अशा समस्येवर काही उपाय देखील सांगण्यात आले आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
स्वप्नात दिवा दिसणे म्हणजे काय?
स्वप्न शास्त्रात गॅस गॅस सिलेंडर पाहणे अशुभ मानले गेले आहे. तर दुसरीकडे स्वप्नात दिवा पाहणे हे एक चांगले संकेत मानले जाते. स्वप्नात दिवा दिसणे म्हणजे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. आगामी काळात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि जीवनात आनंद मिळेल. जीवनातील संकट संपतील. तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत आहात. हे स्वप्न व्यक्तीच्या जीवनात होत असलेल्या प्रगतिचे संकेत आहे . Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)