20.9 C
New York
Saturday, June 3, 2023

Tata Tiago EV : एक रुपयांत धावेल एक किलोमीटर… महिन्याकाठी होईल तब्बल 6500 रुपयांची बचत

Tata Tiago EV : फेस्टिव्ह सीझन (Festive Season) सुरू झालं आहे. अशातच टाटा मोटर्सने (Tata Motors) देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Most Affordable Electric Car) टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) भारतीय बाजारात उतरवून मोठा धमाका केला आहे. टाटाच्या नव्या इलेक्ट्रिक कारची किंमत थक्क करणारी आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ही कार एक रुपयात ही एक किलोमीटर धावते. त्यामुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे.Also Read – Tata Tiago EV: अशी आहे टाटा टियागो इलेक्ट्रिक कार, महागड्या गाड्याही हीच्यासमोर पडतील फिक्या

जाणून घ्या किंमत…

टाटा टियागो ईव्ही कारची किंमत एक्सशोरुम (Tata Tiago EV Ex Showroom Price) केवळ 8 लाख 49 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही इंट्रोडक्टरी प्राईज आहे. पहिल्या 10 हजार ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.
यात कंपनीने 2000 कार आरक्षित ठेवल्या आहेत. ज्या ग्राहकांकडे नेक्सॉन ईव्ही आणि टीगोर ईव्ही आहे, त्यांच्यासाठी कंपनीने या कार आरक्षित ठेवल्या आहेत. मात्र, इंट्रोडक्टरी प्राईजनंतर कारची किंमत किती असेल, याबाबत कंपनीने अद्याप खुलासा केला नाही. टाटा टियागो ईव्ही कारसाठी 10 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होणार आहे. तर जानेवारी 2023 मध्ये ही कार ग्राहकांना डिलिवर करण्यात येईल. Also Read – Tata Tiago EV: Tata Motors ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आज होणार लॉन्च, जाणून घ्या किमतीसह सर्व काही…

Tata Tiago EV दोन बॅटरी पॅकसह लॉन्च…

टाटा कंपनीने 19.2kWh आणि 24kWh च्या दोन प्रकारच्या बॅटरी पॅकसह ही Tiago EV लॉन्च केली आहे. 19.2kWh बॅटरी पॅक मॉडेल XE आणि XT या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. त्यांची अनुक्रमे किंमत 8 लाख 49 हजार आणि 9 लाख 09 हजार रुपये आहे. तसेच या कारचे 24 kWh बॅटरी पॅक मॉडेल 7 व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. त्याची किंमत 11 लाख 79 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

तीन प्रकारचे चार्जिंग ऑप्शन… 57 मिनिटांत 100 टक्के चार्ज

Tata Tiago EV कारचे 24 kWh बॅटरी पॅक असलेले मॉडेल 315 किलोमीटरची रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. तर दुसरे मॉडेल म्हणजेच 19.2 kWh चा बॅटरी पॅक असलेली कार 250 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. कारमध्ये तीन प्रकारचे चार्जिंग ऑप्शन देण्यात आले आहेत. यात 7.2 kW AC चार्जिंग अडीच तासांत तासांत 10 ते 100 टक्के चार्जिंग होईल. DC फास्ट चार्जिंग 57 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज आणि 15A पोर्टेबल चार्जरद्वारे 7 तासांमध्ये बॅटरी 10 ते 100 टक्के चार्ज करेल.

ड्युअल एअरबॅग्ज…

सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून कारमध्ये पुढील बाजूस ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. सोबतच ABS सोबत EBD देण्यात आले आहेत. कारमध्ये कूल्ड ग्लव्ह बॉक्स देखील देण्यात आला आहे. या कारमध्ये ‘फॉलो मी लाईट’ आहे . जो तुम्हाला गर्दीत तुमची कार शोधण्यात मदत करते.

याशिवाय कारचे केबिन प्रीमियम बनवण्यात आले असून त्यात फ्लॅट बॉटम स्टाईलसह स्टिअरिंग देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत. यामध्ये डेलाइट रनिंग लॅम्प डीआरएल देण्यात आले आहे. ते रात्री तसेच दिवसाही सुरू राहतील. शानदार पिकअप आणि पॉवरसाठी कारमध्ये स्पोर्ट्स मोड दिला आहे. तसेच रिअल टाईम चार्ज स्टेटस पाहू शकतात.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles