Team India: ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरु होत आहे. सर्वच संघांनी याची जोरदार तयारी केली आहे. टीम इंडियाने देखील या विश्वचषकासाठी कंबर कसली आहे. टीम इंडियात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात एक स्टार खेळाडू आहे जो भारतीय संघासाठी शेवटचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) खेळणार आहे. या टी-20 विश्वचषकानंतर (T20) हा खेळाडू निवृत्तीची घोषणा करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
आगामी टी-20 विश्वचषकासाठी निवड समितीने 37 वर्षीय दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) टीम इंडियात संधी दिली आहे. यापूर्वी कार्तिकने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावरच त्याचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेकदा फिनिशरची भूमिका बजावली आहे. कार्तिकच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे विरोधी गोलंदाजांच्या नाकी नऊ येतात. टीम इंडियाच्या विजयात कार्तिकची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
फलंदाजीसह यष्टिरक्षणही जबरदस्त
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हा असा खेळाडू आहे जो शेवटच्या फळीत उतरून ही धडाकेबाज फलंदाजी करण्यात माहिर आहे. आपल्या जबरदस्त फलंदाजीमुळे तो कोणत्याही गोलंदाजाला सडो की पळो करून सोडतो. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने दोन चेंडूंत चौकार आणि षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. कार्तिक हा असा खेळाडू आहे ज्याने टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने 26 कसोटी सामन्यांमध्ये 1026 धावा, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा आणि 51 टी-20 सामन्यात 598 धावा केल्या आहेत. यासह तो 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग देखील होता. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास
टी-20 विश्वचषकानंतर निळ्या जर्सीला देईल निरोप
भारतीय संघात दिनेश कार्तिक सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आहे. आजच्या घडीला त्याचे वय 37 वर्षाचा असून तीन वर्षांनंतर तो टीम इंडियात परतला आहे. यानिमित्ताने टीम इंडियाने 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावावे अशी त्याची इच्छा आहे. मात्र कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी ऋषभ पंतकडून (Rishabh Pant) स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. टी-20 विश्वचषकानंतर तो निळ्या जर्सीला निरोप देत निवृत्ती घेऊ शकतो.