9.8 C
New York
Thursday, March 23, 2023

T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहची टी 20 वर्ल्ड कपमधून माघार- रिपोर्ट

T20 World Cup : क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) काही दिवसच शिल्लक असताना टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने टी 20 वर्ल्ड कपमधून माघार घेण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah News) याला दुखापत झाल्यामुळे तो संपूर्ण टी 20 वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही. जसप्रीत याला पूर्णपणे बरे होण्यासाठी 4 ते 6 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे समजते.Also Read – Alia Bhatt Maternity Photoshoot : कसली हॉट दिसतेय आलिया भट्ट, मॅटेलिक गाऊनमध्ये केलं मॅटरनिटी फोटोशूट

रवींद्र जडेजानंतर आता जसप्रीत बुमराह देखील टी 20 वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही आहे. जडेजाच्या गुढघ्यावर सर्जरी झाली आहे. त्यामुळे तो देखील सध्या विश्रांती घेत आहे. Also Read – Professor Recruitment : विना PhD आणि NET न देता तुम्ही बनू शकतात प्रोफेसर, जाणून घ्या UGC चा नियम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI च्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी (PTI) संवाद साधताना ही माहिती दिली. जसप्रीत बुमराह सध्या पाठदुखीच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे. त्याला या दुखण्यातून सावरण्यासाठी 4 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे बुमराह याला टी 20 वर्ल्ड कपला मुकावे लागणार आहे. Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

जतप्रीत बुमराह याने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन सामन्याच्या टी 20 मालिकेतील दोन सामने खेळले होते. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात देखील तो थिरुवनंतपुरमच्या मैदानावर दिसला नाही.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची पहिली लढत

टी 20 वर्ल्ड कपमध्ये 23 ऑक्टोवरला मेलबर्नच्या मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये पहिली लढत होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्ड कपच्या एकाच ग्रुपमध्ये आहे. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये पाकिस्तानने भारताला आस्मान दाखवलं होतं. टीम इंडियाला तर सेमीफाइनलच्या आधीच टूर्नामेंटमधून बाहेर व्हावं लागलं होतं. आता टीम इंडिया गेल्या वर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या परभवाचा वचपा काढेल का, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये केव्हा आणि कुठे आहेत टीम इंडियाच्या लढती ?

> भारतविरुद्ध पाकिस्तान – पहिली लढत – 23 ऑक्टोबर (मेलबर्न)

> भारतविरुद्ध ग्रुप ए रनर-अप – दुसरी लढत – 27 ऑक्टोबर (सिडनी)

> भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका – तिसरी लढत – 30 ऑक्टोबर (पर्थ)

> भारतविरुद्ध बांग्लादेश- चौथी लढत – 2 नोव्हेंबर (एडिलेड)

> भारतविरुद्ध ग्रुप बी विनर- पाचवी लढत – 6 नोव्हेंबर(मेलबर्न)

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles