Tejasswi Prakash News House : छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ आणि ‘बिग बॉस सीझन 15’ ची विनर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या चांगलीच चर्चेत असते. तेजस्वी प्रकाश ही टीव्ही इंडस्ट्रीतील (TV Industry) एक यशस्वी अभिनेत्री आहे. तेजस्वी प्रकाश हिचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये घेतले जाते ज्यांनी खूप कमी वेळात एक नवीन यशोगाथा रचली आहे. तेजस्वी प्रकाशने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी खूप काही साध्य केले आहे. तेजस्वी प्रकाश आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे त्या मागचे कारण म्हणजे तिने गोव्यामध्ये आलिशान घर (Tejasswi Prakash News House) खरेदी केले आहे. काही दिवसांपूर्वीच तेजस्वीने ब्रँडेड कार (Tejasswi Prakash Car) देखील खरेदी केली होती.Also Read – Bigg Boss Marathi 4 : बहुचर्चित बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला, हे 16 स्पर्धक गाजवणार यंदाचा सीझन!
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने इतर सेलिब्रिटींप्रमाणेच गोव्यामध्ये घर घरेदी करण्यास पसंती दिली आहे. तिने गोव्यात आलिशान घर खरेदी केले आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्वी तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत गोव्याला गेली होती. सगळ्यांना असे वाटले होते की, तेजस्वी सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली होती. पण खरी गोष्ट करण कुंद्राच्या इन्स्टा स्टोरीनंतर समोर आली. खरं तर तेजस्वी गोव्यात घर खरेदी करण्यासाठी गेली होती. Also Read – Urfi Javed ने पहिल्यांदाच शेअर केला बेडरूममधील फोटो, पाहून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क!
करण कुंद्राने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीजवर तेजस्वी प्रकाशचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तेजस्वी प्रकाश तिच्या नवीन घरामध्ये पूजा करताना दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करत करण कुंद्राने कॅप्शनमध्ये ‘अभिनंदन बेबी, तू या जगासाठी पात्र आहेस! मला तुझा खूप अभिमान आहे, तू छोटे मेहनती उंदीर आहे, देव करो तुला प्रत्येक शहरात घर मिळो.’ करण कुंद्राने हा व्हिडिओ शेअर करत तेजस्वी प्रकाशप्रती प्रेम व्यक्त केले आहे.
तेजस्वी प्रकाश दिवसेंदिवस प्रगती करतच चालली आहे. अगदी 29 व्या वर्षी तेजस्वीने आलिशान घर आणि आलिशान गाडी खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने नवीन लग्झरी कार खरेदी केली. तेजस्वीने Audi Q7 कार खरेदी केली होती. या कारची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. दरम्यान, तेजस्वीने आपल्या करिअरची सुरुवात ‘2612’ या मालिकेतून केली होती. मात्र, ‘संस्कार धरोहर अपना की’ या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि ‘स्वरागिनी’, ‘खतरों के खिलाडी 10’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. त्यानंतर तिने ‘बिग बॉस 15’ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.