Urfi Javed : फॅशन आयकॉन बनलेली उर्फी जावेद (Urfi Javed)नेहमीच तिच्या लूकने लोकांना आश्चर्यचकित करत असते. नुकतीच उर्फी सिमकार्डने तयार केलेला ड्रेस परिधान (sim cards dress) करून दिसली होती. तिने 2000 सिमकार्डने बनवलेला ड्रेस घातला होता. यानंतर अजून एक अतरंगी आउटफिट घालून तिने लोकांना पुन्हा एक धक्का दिला आहे. उर्फी जावेदच्या (Urfi Javed look) या ड्रेसची कोणी कल्पना देखील करु शकत नाही. तिने चक्क काचांचे तुकडे आपल्या शरीरावर लावले आहेत. एवढेच काय तर तिने चेहऱ्यावर देखील काचांचा मास्क लावला आहे. तिचा हा जगावेगळा लूक पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.Also Read – Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!
डान्स करताना दिसली उर्फी
उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने काचांनी आपली छाती कव्हर केल्याचे दिसत आहे. यासोबतच तिने चेहऱ्यावर देखील काचांचा मास्क लावला आहे. या व्हिडिओमध्ये ती दर्द ए डिस्को या गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने आता याला काय मेकअप आणि हेअर क्रेडिट देऊ? असेही लिहिले आहे. आता तिच्या या व्हिडिओवर लोकांच्या विविध कमेंट्स येत आहेत. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!
ट्रोलर्सला आली राज कुंद्राची आठवण
उर्फी जावेद तिच्या स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या अशा हटके स्टाइलचे फोटोज आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात. तिचा हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर यूजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट देखील करत आहेत. काही लोक तिची स्तुती करत आहेत. तर काही ट्रोल करत आहे. लोकांना तिच्या चेहऱ्यावरील मास्क पाहून राज कुंद्राची देखील आठवण येत आहे. तिला लोकांनी फीमेल राज कुंद्रा असे म्हटले आहे. कारण राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चेहऱ्यावर काळा मास्क लावून घराबाहेर पडताना दिसतोय. Also Read – Hina Khan Photos: व्हाइट साडीत खुलले हिना खानचे सौंदर्य, पाहिला नसेल असा हटके लूक!
हा व्हिडिओ होतोय व्हायरल
View this post on Instagram
अनेकदा झाली आहे टॉपलेस
उर्फी जावेद नेहमीच वेगळ्या लूकमध्ये लोकांसमोर येत असते. अनेकदा ती टॉपलेस देखील झाली आहे. यापूर्वी एकदा तिने केवळ जिन्स घालत केस मोकळे सोडून फोटो शेअर केला होता. यावेळी तिने केसांनी शरीर झाकले होते. ती कधी सेफ्टी पिनपासून तयार केलेला ड्रेस घालून पोझ देताना दिसते. तर कधी न्यूज पेपरचा ड्रेस घालते. तर कधी ती पॉलिथिन गुंडाळून फोटो शेअर करते. आपल्या विविध लूकमुळेच ती सध्या लाइमलाइटमध्ये आहे.