Uri Surgical Strike Anniversary: भारताच्या इतिहासात (Indian History) आजचा दिवस म्हणजेच 29 सप्टेंबरचे विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी भारतीय सैनिकांनी (Indian Army) आपले शौर्य दाखवत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असा मोठा संदेश जगाला दिला होता. सहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) घुसून दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. उरी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी 11 दिवसांनंतर ही सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) करण्यात आली होती.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी पहाटेच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर हल्ला केला होता. यात भारतीय लष्कराचे 18 जवान शहीद झाले होते. भारतीय लष्करावरील हा मोठा हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून 28 आणि 29 सप्टेंबर 2016 च्या रात्री सर्जिकल स्ट्राइक केले. ज्यात दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड नष्ट करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
अशी होती सर्जिकल स्ट्राईक
उरी हल्ल्याचा वचपा आणि पाकिस्तानसह दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी उरी हल्ल्याच्या ठीक 10 दिवसानंतर भारताने 150 कमांडोजच्या मदतीने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केली होती. भारतीय लष्कराने 28 आणि 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकिस्तान सीमेच्या 3 कि.मी. आत घुसून ही सर्जिकल स्ट्राईक केली होती. यावेळी भारतीय लष्कराचे कमांडोज एम- 4 सारख्या रायफल, ग्रेनेड्स, स्मोक ग्रेनेड्स, अंडर बॅरेल ग्रेनेड लॉन्चरसह अत्याधुनिक शास्त्रांनी लेस होते. दहशतवादी तळाजवळ पोहचताच भारतीय लष्कराच्या जवानांनी शौर्य दाखवत पाकिस्तानच्या 2 सैनिकांसह 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हा प्रसंग अतिशय थरारक होता. भारतीय लष्कराने हल्ला करताच दहशतवाद्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. या सर्जिकल स्ट्राईकच्यानिमित्ताने जगाला नव्या भारताचे रूपही दिसले. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
सर्जिकल स्ट्राईकला आज 6 वर्षे पूर्ण झाले आहे. भारतीय लष्कराच्या शौर्याचे प्रतिक म्हणून देशभरात दरवर्षी 29 सप्टेंबर सर्जिकल स्ट्राईकचा जल्लोष आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला वंदन केले जाते. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा आजचा दिवस असून भारताच्या इतिहासात या दिवसाचे खास महत्त्व आहे.