8.9 C
New York
Saturday, December 9, 2023

Vinayak Chaturthi 2022: आज आहे विनायक चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी

Vinayak Chaturthi 2022: हिंदू धर्मात गणपतीला (Lord Ganesha) प्रथम पूजनीय देवता मानले जाते. गणपती हे सुख आणि समृद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात. गणेश पूजनाशिवाय (Ganesh Poojan Vidhi) कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आणि विनायक चतुर्थी गणपतीला (Vinayak Chaturthi) समर्पित आहे. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. हिंदू कालगणनेनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षाची चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. त्यानुसार आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी विनायक चतुर्थी साजरी होत आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

ज्योतिष शास्त्रानुसार विनायक चतुर्थीला गणेश पूजन केले जाते. ही पूजा खूप शुभ मनाली जाते. या भगवान गणेश पूजेने प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान देतात. तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. या दिवशी विधिवत पूजा केल्यास आणि उपवास केल्यास कुटुंबावर श्री गणेशाची कृपा होते. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी गुरुवारी 29 सप्टेंबर 2022 रोजी साजरी केली जाईल. चतुर्थी तिथी 29 सप्टेंबर रोजी 1:28 वाजता (रात्री) सुरू होईल आणि 30 सप्टेंबर, 12:09 (रात्री) समाप्त होईल. उदय तिथीनुसार 29 सप्टेंबर रोजी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 ते दुपारी 1.23 पर्यंत असेल. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

अशी करा पूजा

विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजेसाठी चौरंग किंवा पाठ घ्या. त्यावर पिवळे कापड ठेवून त्यावर श्रीगणेशाची मूर्ती ठेवा. गणेशासमोर धूप-दीप लावा आणि गणेश चालिसाचा पाठ करा. सोबत विनायक चतुर्थी व्रत कथा वाचावी. पूजेच्या शेवटी श्रीगणेशाचे ध्यान करावे आणि सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करावी.

करा हा उपाय

विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या पूजेत चंदन आणि हळदीच्या तिलकला महत्त्व आहे. यादिवशी पूजेदरम्यान  गणपतीला शेंदुराचा तिलक लावावा. शेंदूरचा तिलक लावल्याने गणपतीची कृपा होते. देवाला शेंदूरचा तिलक लावल्यानंतर तुमच्या कपाळावरही शेंदुराचा तिलक लावावा. तसेच ‘सिंदूरम् शोभनम् रक्तम सौभाग्यम् सुखवर्धनम्’. शुभदं कामदं चैव सिंदूरम् प्रतिगृह्यम्’ या मंत्राचा जप करावा.

(टीप – या लेखात दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांंवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles